Rifle Shooter hand National  sakal
नागपूर

नेमबाजाच्या हाती रायफलऐवजी चाकू अन चमचे!

पोटासाठी राष्ट्रीय खेळाडू हर्षल झाडेने लावले मोमोज विक्रीचे दुकान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजीच्या अनेक स्पर्धा गाजवल्या. पदके, मानसन्मान मिळविलेत. मात्र कोरोनानंतर अचानक लॉकडाउन लागल्याने त्याच्या हातात रायफलऐवजी चाकू अन चमचे आले. हलाखीची परिस्थिती व सरावाअभावी बंद झालेल्या मिळकतीमुळे त्याला नाईलाजाने पोटापाण्यासाठी रस्त्यावर मोमोज विक्रीचे दुकान सुरू करावे लागले.

ही संघर्षमय कहाणी आहे उपराजधानीतील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या प्रतिभावान राष्ट्रीय नेमबाज हर्षल झाडेची. २७ वर्षीय हर्षलने गेल्या दहा ते पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत जिल्हा, विद्यापीठ, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धांमध्ये जवळपास डझनभर पदके मिळविलीत.

२०१३ ते २१ दरम्यान तब्बल नऊ वर्षे त्याने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये शहराचे प्रतिनिधित्व केले. २०१८ मध्ये हुबळी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वप्न रंगवत असताना अचानक कोरोनाचे संकट उभे ठाकले.

नेमबाजाच्या हाती रायफलऐवजी चाकू अन चमचे!

त्यामुळे स्पर्धांसोबतच नियमित प्रॅक्टिसही बंद झाली. गेल्या वर्षीपर्यंत हर्षल नागपूर येथील एका क्रीडा संकुलात (एसपीआय शुटिंग अकादमी) नेमबाजीचा सराव करत होता. यावेळी तो इतरांनाही प्रशिक्षण देण्याचे काम करायचा. त्यातून मिळणाऱ्या थोड्याफार उत्पन्नातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा.

हर्षलच्या वडिलांचे २००८ मध्ये निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी थोरला मुलगा या नात्याने स्वतः हर्षल व आईवर येऊन पडली. लॉकडाउनने कमाईचे साधन हिरावून घेतल्यामुळे हर्षलच्या परिवारावर आर्थिक संकट ओढवले. यातून परिवाराला सावरण्यासाठी त्याने काही महिन्यांपूर्वी मित्रांच्या मदतीने रामेश्वरी परिसरात मोमोज विक्रीचे दुकान थाटले. त्यामुळे कधीकाळी हातात रायफल (बंदूक) पकडून लक्ष्यावर अचूक नेम साधणाऱ्या हर्षलच्या हातात अचानक चाकू आणि चमचे आलेत. मोमोज विक्रीतून होणाऱ्या कमाईतून तो सध्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी धडपड

क्रीडाभूषण पुरस्काराने सन्मानित हर्षलचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे. त्याची तयारी करण्यासाठी सध्या तो तरंग फाउंडेशनच्या मदतीने दिल्लीला प्रशिक्षण घेत आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघ निवडण्याकरिता लवकरच भोपाळमध्ये होऊ घातलेल्या निवड चाचणीत तो सहभागी होणार आहे. यात चांगली कामगिरी केल्यास हर्षलची भारतीय संघात निवड होऊन त्याचे स्वप्न साकार होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, याची जाणीव असल्याने दुकान तात्पुरते पुतण्याच्या स्वाधीन करून त्याने आपले सर्व लक्ष सध्या चाचणीवर केंद्रीत केले आहे.

मी कुटुंबासाठी नाईलाजाने का होईना मोमोज विक्रीचा ठेला लावला असला तरी, ते माझे अंतिम ध्येय नाही. मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवून देशाची मान उंचवायची आहे. तेच माझे स्वप्नही आहे. निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारावर माझी भारतीय संघात निवड होईल, अशी आशा आहे.

- हर्षल झाडे, राष्ट्रीय नेमबाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT