rte admission of 3476 student confirmed and no further extension education Sakal
नागपूर

RTE Admission : ३ हजार ४७६ जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित तर ३ हजार जागा रिक्त; RTE प्रवेशाला मुदतवाढ नाही

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : अतिवृष्टीचा फटका आरटीई प्रवेशाला बसल्याने गुरुवारपर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी ३ हजार ४७६ जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली नाही. यामुळे ३ हजार ४४४ जागा रिक्त आहेत.

यावर्षी सुरुवातीपासूनच आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू झाला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. मात्र, अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळे प्रवेश होऊ शकले नाही. दरम्यान न्यायालयाने आदेश दिल्यानंतर १ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला.

प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून ८ ऑगस्टपर्यंत प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली होती. यासाठी शहरासह जिल्ह्यातील ६५४ शाळांचा समावेश आहे. यंदा ६ हजार ९१८ जागा आहेत. प्रवेशासाठी २० हजार ३४३ ऑनलाइन अर्ज आले होते.

त्यातील ६ हजार ६४८ अर्जाची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार ४७६ जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. तर ३ हजार ४४२ जागा रिक्त आहेत. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिला जातो.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ सी (१) अनुसार दुर्बल, वंचित, आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना २५ टक्के जागांवर इंग्रजी व विनाअनुदानित शाळेत प्रवेश दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : लालबागचा राजाच फटाके वाजवून स्वागत

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT