rupali chakankar chitra wagh minor girl delivered her own baby with the help of a YouTube tutorial in nagpur  
नागपूर

Nagpur News : पुण्यानंतर आता नागपुरात युट्यूबवर बघून मुलीनं केली स्वतःची प्रसुती; रुपाली चाकणकर म्हणाल्या…

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने चक्क यू-ट्यूबवर बघून स्वतःची प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन कसून तपास सुरू केला आहे.

राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना धक्कादायक असून गेल्या तीन महिन्यापूर्वी पुणे शहरात देखील अशीच घटना घडली होती. या घटनेमध्ये आरोपीने बलात्कार केल्यानंतर किंवा संबंधीत व्यक्तिशी असलेले शारीरिक संबंध त्यातून गरोदरपणा लपवून ठेवत झालेली प्रसुती अशाच प्रकारची घटना घडली होती. याच घटनेची पुनरावृत्ती आपण पाहतोय.

सुरुवातील ज्या डॉक्टरांनी या तरुणीची तपासणी केली होती त्यांनी याबद्दलची माहिती देणे गरजेचे होते, अशी माहिती लपवून ठेवल्याबद्दल संबंधित डॉक्टर किंवा व्यक्ती असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा कॉलेजमध्ये या विषयावर समुपदेशन केलं जातं. पण समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे असे चाकणकर म्हणाल्या.

घडलेल्या प्रकारावर बोलताना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, ही अतिशय हृदयद्रावक आणि वाईट वाटावं अशी घटना आहे. निसर्गचक्र बदललं आहे. १२ वर्षांच्या मुलींना पाळी येतेय. त्यांना शरिरात झालेले बदल समजू शकत नाहीयेत. त्यांच्या पालकांना देखील काय समजावून सांगावं ते कळत नाहीये. अशा वेळी फक्त मुलींचं नाही तर मुलांचंदेखील समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

एका अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. एक-दोन महिन्यांच्या चॅटिंगनंतर एका दिवशी आरोपी तरुणाने तिला बाहेर बोलावलं आणि शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर सदरील अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ३ मार्च रोजी रात्री तिची प्रसूती झाली.

संबंधीत अल्पवयीन मुलेने गर्भवती असल्याची माहिती लपवून ठेवत युट्यूबवर पाहून स्वतःची प्रसूती केली. या दरम्यान भीतीपोटी तिने बाळाचा जीव देखील धोक्यात टाकला नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. सध्या मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT