Sagar Chandrakishor kumbhar sakal
नागपूर

Sagar Chandrakishor Kumbhar : नागपूरच्या सागरने केले माऊंट फ्रेंडशिप शिखर सर

उपराजधानीतील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक सागर चंद्रकिशोर कुंभारे याने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील माऊंट फ्रेंडशिप पिक हे १७,३४८ फुट उंचीचे शिखर सर करण्याचा पराक्रम केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानीतील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक सागर चंद्रकिशोर कुंभारे याने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील माऊंट फ्रेंडशिप पिक हे १७,३४८ फुट उंचीचे शिखर सर करण्याचा पराक्रम केला.

आयएमएफ इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनतर्फे १६ ते २३ जूनदरम्यान आयोजित या साहसी मोहिमेच्या चढाईला २० जूनला रात्री साडेदहा वाजता सुरुवात झाली व दुसऱ्या दिवशी पावणे नऊ वाजता त्यांनी शिखर सर केले. या अभियानासाठी सागरसह महाराष्ट्रातील एकूण १४ गिर्यारोहकांची निवड झाली होती. त्यातील सहा गिर्यारोहकांनी यश मिळविले. यात विदर्भातील सागर कुंभारे (नागपूर), प्रवीण शेळके (अंजनगाव), आदर्श मास्ते (चंद्रपूर) व अतीश चारोडे (वर्धा) या चौघांचा समावेश आहे. प्रतिकूल वातावरणामुळे अन्य गिर्यारोहकांना माघार घ्यावी लागली.

यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून या गिर्यारोहकांनी उणे २५ डिग्री तापमानात योग व प्राणायम केले. तरुणांमध्ये योग व व्यायामाबद्दल जनजागृती करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता, असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता प्राप्त सागरने सांगितले. मोहिमेपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कमांडर अंकित बत्रा व अन्य मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सागरने याआधी २१ हजार फूट उंचीच्या माऊंटब्लॅकसह माऊंटअबू, पातालसू, किलीमंजारो, माऊंट युनाम इत्यादी शिखरे सर केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT