Nagpur Omicron Marathi News Updates sakal
नागपूर

नागपूर : एकाच दिवशी तिघांना ‘ओमिक्रॉन’ची बाधा

उपराजधानीची चिंता वाढली; १७ दिवसात आढळले ६ बाधित, माजी खासदाराचा भाऊ ओमिक्रॉनबाधित

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Omicron Updates: कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच नवीन व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनने उपराजधानीत हातपाय पसरले. एकाच दिवशी ३ ओमोक्रॉनबाधित आढळले. यामुळे नागपूरची आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दोन दिवसांपूर्वी ओमिक्रॉन बाधित महिलेचा पती ओमिक्रॉनबाधित आढळला. तर पूर्व आफ्रिकेवरुन परतलेला तरुणही ओमिक्रॉनबाधित आढळला आहे. खासगी रुग्णालयात दाखल असलेले पन्नास वर्षीय व्यक्तीला देखील ओमिक्रॉनची बाधा झाली. विशेष असे की, ही व्यक्ती खासगीत दाखल असून त्यांनी ओमिक्रॉनवर मात केली. ओमिक्रॉनमुक्त झाल्यानंतर एका व्यक्तीच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १७ दिवसांत उपराजधानीत ६ ओमिक्रॉनबाधित आढळले ही चिंताजनक बाब असल्याचे स्पष्ट झाले. (same day, 3 Omicron were found to be infected)

गांधीबाग झोन परिसरातील २१ वर्षीय तरुण पूर्व आफ्रिकेच्या मलावी येथून विमानाने मुंबईला पोहोचला. तिथे नियमाप्रमाणे कोरोना चाचणी केली. बुधवारी (ता. २२) रोजी नागपुरात परतला. नागपूर परतल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचा अहवाल मुंबईतील प्रशासनाकडून नागपूर महापालिका प्रशासनाला कळविला.(Nagpur Omicron Marathi News Updates) यानंतर त्याचा शोध घेऊन त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा बुधवार २९ डिसेंबरला ओमिक्रॉनबाधित आढळला. हनुमाननगर झोनमधील २९ वर्षीय महिला २७ डिसेंबरला ओमिक्रॉनबाधित आढळली होती. महिलेचा पती आणि ही महिला १५ डिसेंबर रोजी दुबई येथून मुंबईला आली. दुबईत या दाम्पत्यांनी कोरोना चाचणी झाली. त्यात त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्याच दिवशी डोमेस्टिक फ्लाईटने सदर दाम्पत्य हे नागपुरात डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. हे दाम्पत्य थेट स्वतःच्या घरी पोहचले. १९ डिसेंबर रोजी या दोघांचीही कोरोनाची चाचणी केली. यात २० डिसेंबर रोजी हे दाम्पत्य कोरोना बाधित आढळले. यानंतर विदेशी प्रवासाचा इतिहास असल्याने एम्समध्ये दाखल केले. दरम्यान जनुकिय चाचणी (जिनोम सिक्वेन्सिंग)साठी नमुने पाठवले. यात पत्नीला ओमिक्रॉनची बाधा असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने दिला. दुसऱ्याच दिवशी पतीचेही नमुने ओमिक्रॉनबाधित आढळले.(couple tested a corona test in Dubai)

नव्याने २७ कोरोनाबाधित

कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत येणार असल्याचे संकेत असतानाच दुबई, आफ्रिकेसह इतर देशातून आलेल्यांना ओमिक्रॉनची बाधा होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दिवसभरात बुधवारी (ता.२९) २७ नव्या बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात ४ हजार ६५४ चाचण्या झाल्या. यात २७ जण बाधित आढळले. यामुळे जिल्ह्यात आता १७५ सक्रिय बाधितांची संख्या झाली आहे. यामुळे प्रशासनाने नव्याने चिंता व्यक्त केली आहे. दिवसभरात जिल्ह्यातून ४ जणांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत ४२ लाख १२ हजार ७७ कोरोनाच्या आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन रॅपिड चाचण्या झाल्या असून यात ४ लाख ९३ हजार ९३१ जण कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४ लाख ८३ हजार ६३४ जणांनी मात केली. तर १० हजार १२२ जण दगावले आहेत.

तपासणीला उशीर धोक्याचे

उपराजधानीत नीरी संस्थेत जिनोम सिक्वेन्सिंग तपासण्याची यंत्रणा आहे. येथील अहवाल दोन दिवसात मिळतात, मात्र याकडे दुर्लक्ष करीत नागपूर महापालिका प्रशासनाकडून ओमिक्रॉनची बाधा झाली किंवा नाही, याची जनुकिय चाचणीसाठी नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येतात. संशयित ओमिक्रॉनबाधित असल्याचा अहवाल पुण्यातून प्राप्त होण्यासाठी सात पेक्षाही अधिक दिवसांचा कालावधीत लागतो. १७ दिवसांत ६ ओमिक्रॉनबाधित आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा विळखा उपराजधानीला बसत आहे. बुधवारी आढळलेल्या ओमिक्रॉन बाधितांमध्ये एका माजी खासदाराचा भाऊ असल्याची माहिती आहे. तसेच अनेक पुढाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची जोरदार चर्चा उपराजधानीत आहे.

तारीखनिहाय ओमिक्रॉनबाधित

  • १२ डिसेंबर पहिला

  • २३ डिसेंबर दुसरा

  • २७ डिसेंबर तिसरा

  • २९ डिसेंबर तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT