sandeep joshi criticized nitin raut on lockdown decision in nagpur  
नागपूर

लॉकडाउन म्हणजे वेडेपणाचा निर्णय, संदीप जोशींची पालकमंत्र्यांवर टीका

राजेश प्रायकर

नागपूर : लॉकडाउन घोषित केल्यामुळे माजी महापौर संदीप जोशी यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावर टीका केली. हा वेडेपणाचा निर्णय असल्याची जोरदार टीका केली. संदीप जोशी यांच्या टीकेमुळे कोरोनाच्या गंभीर स्थितीत पालकमंत्रीविरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राऊत यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर माजी महापौर संदीप जोशी यांनी व्हीडीओ जारी करून पालकमंत्र्यांच्या निर्णयाचा समाचार घेतला. गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि नियम पाळणाऱ्यांसाठी हा पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत क्लेशदायक आहे. आपल्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी सामान्यांवर लॉकडाउन लादणे हे चुकीचे पाऊल आहे, अशी टीका जोशी यांनी केली आहे. 

महापौरांचा सावध पवित्रा - 
माजी महापौर संदीप जोशी यांनी थेट टीका केली असली तरी पक्षातील त्यांचे सहकारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. महापौर तिवारी यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी 'सावधान, १५ ते २१ मार्चदरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाउन' एवढेच नमुद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पोस्टवर अनेकांनी 'कमेंट'मध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना लॉकडाउनला विरोध केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT