nagpur sakal
नागपूर

Nagpur Crime : डोळ्यांत मिरची पूड टाकून सराफाला लुटले

८० लाखांचे दागिने घेऊन चोरटे पसार; टाकळघाट-खापरी मार्गावरील घटना

सकाळ डिजिटल टीम

टाकळघाट : येथील सराफा व्यावसायिकाची चोरट्यांनी लूटमार करून त्याच्याकडील ८० लाखाच्या सोने-चांदी दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारच्या रात्री दहाच्या सुमारास टाकळघाट-खापरी (मोरेश्वर) मार्गावर घडली.

सराफा व्यावसायिक अतुल रामकृष्ण शेरेकर ( वय ३७) रा. खापरी (मोरेश्वर) यांचे टाकळघाट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र समोर रामशिव पॅलेसमध्ये १५ वर्षांपासून ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी आठवडी बाजार असल्यामुळे सर्वत्र रस्त्यावर रेलचेल राहते. नेहमीप्रमाणे रात्री ९ च्या सुमारास दुकान बंद करून आपल्या कारने (एमएच ४० एआर.९०४९) ने खापरी (मोरेश्वर)ला निघाले.

खापरी (मोरेश्वर)च्या मधोमध जाताच दुचाकी (एमएच ३१ डी. एच.१००९) हिने अतुलच्या कारसमोर आणून त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच कारला जोरदार धडक दिली. त्यातच अतुल दरवाजा उघडून बाहेर येताच त्याला नाव विचारले. त्यांनी त्याचे नाव शुभम सांगितले. अतुलने तुला लागलं का असे सुद्धा विचारले. लगेच त्याच्या साथीदाराने लाल मिरची पावडर काढून त्याच्या डोळ्यांत फेकली व त्याला खाली नाल्यात धक्का देऊन ढकलून दिले. तसेच कारमध्ये असलेली सोने, चांदी व रोख रक्कमची बॅग घेऊन दुचाकीने पळ काढला. बॅग घेऊन लुटाऱ्यांनी पळ काढल्याचे समजल्यावर अतुल यांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करते वेळी अतुलचे डोळ्यात मिरची पावडर गेल्याने कारवरून नियंत्रण सुटल्याने नाल्यात ती पलटी घेतली. त्यामध्ये अतुल किरकोळ जखमी झाला. लुटारूंनी आपली दुचाकी नाल्यात फेकून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच टाकळघाट येथील पोलिस पाटील विलास डायरे व काही नागरिक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दारच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले व एसडीपीओ पूजा गायकवाड, बुटीबोरी ठाणेदार भीमाजी पाटील यांनी घटनास्थळ पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत श्वान पथकाला बोलविण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.घटनेबाबत आमचे पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

-पूजा गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी

आरोपी पकडण्यात पोलिसांनायश येणार का?

गांभीर्य लक्षात घेता नागपूर ग्रामीण पोलिसांचे बळ काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन तातडीने तपासाला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक डॉ संदीप पखाले यांनी भेट दिली. तसेच घटनेचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार ठिकठिकाणी पोलिसांचे पथक शोध घेत आहेत. प्रत्येक सीसीटीव्ही पिंजून काढले असल्याने लवकरच आरोपीचा सुगावा लागण्यात यश येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दीड दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सुद्धा आरोपी पकडण्यात आले नाही. हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून आरोपी पकडण्यात यश येणार का असा प्रश्न नागरिक विचारत आह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT