नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ बॉम्बने उडविणार असल्याच्या धमकीचा ई-मेल पुन्हा मंगळवारी एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाला (एएआय) मिळाला. या धमकीमुळे विमानतळ परिसरात खळबळ उडाली. संपूर्ण विमानतळाची पहाटे तपासणी करण्यात आली. अशी ई-मेलच्या माध्यमातून धमकी देण्याची चोवीस तासातील दुसरी वेळ असून गेल्या दोन महिन्यांतील ही चवथी घटना आहे.
विमानतळांवर बॉम्ब असल्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवारी पहाटे मिळाला. विमानतळांवरील पाईपमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा उल्लेख ई-मेलमध्ये होता. तो इमेल विमानतळ प्रशासन पाहणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडला फॉरवर्ड केला गेला. यात नागपूर विमानतळावरील पाईपमध्ये बॉम्ब असल्याचे म्हटले होते. सतत विमानतळ उडविण्याच्या धमकीमुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
विमानतळावर बॉम्ब डिटेक्शन अॅण्ड डिस्पोजल स्क्वाड (बीडीडीएस) आणि श्वान पथक तैनात करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) चमूद्वारे पहाटेच संपूर्ण विमानतळासह प्रवाशांची तपासणी करण्यात आली. आता दक्षता बाळगण्यात येत आहे. सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. पार्किंग परिसरात वाहनांची तपासणी केली जात आहे. विमानतळाच्या हद्दीबाहेरही गस्त घालण्यात येत आहे. विमानतळाच्या सुरक्षेत पोलिस कार्यरत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील काही दिवस विमानतळावर कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा इ मेल मंगळवारी मिळाला. तातडीने सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि विमानतळाची तपासणी केली. तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र, विमानतळावर हायअलर्ट दिलेला आहे.
- आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक. नागपूर विमानतळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.