Nagpur Crime News Sakal
नागपूर

Nagpur Crime News : चोरीच्या ट्रकचे चेसिस क्रमांक बदलवून विक्री; मुंबई गुन्हे शाखेचा नागपुरात छापा

परराज्यात चोरी झालेले ट्रक महाराष्ट्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात आले आहेत. हे ट्रक एपीएमसी ट्रक टर्निमल परिसरात उभे असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हेशाखेच्या मोटार वाहनचोर शोध कक्षाला मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : शहरातील आरटीओमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागपुरातून चोरीच्या ट्रकचे चेसिस क्रमांक बदलवून त्याची विक्री केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात मुंबईच्या गुन्हे शाखेने नागपुरात छापा टाकून एका एजंटला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. या छाप्याने आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशातून ट्रक चोरी करून नागपुरात आणण्यात आले. येथे या ट्रकचे चेचिस क्रमांक बदलविण्यात आले. बनावट दस्तऐवजांच्या आधारे नागपूर प्रादशिक परिवहन विभागाच्या ग्रामीण कार्यालयात नोंदणी करण्यात येऊन या चोरीच्या ट्रकची मुंबई, महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणात विक्री करण्यात आली.

परराज्यात चोरी झालेले ट्रक महाराष्ट्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात आले आहेत. हे ट्रक एपीएमसी ट्रक टर्निमल परिसरात उभे असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हेशाखेच्या मोटार वाहनचोर शोध कक्षाला मिळाली.

४ मार्चला पोलिसांनी एमपीएमसी टर्मिनल परिसरात छापा टाकला. पोलिसांनी एमएच-४०-सीएम-१५६७ व एमएच-४०-सीएम३०९८ या क्रमांकाचे दोन ट्रक जप्त केले. १५६७ क्रमांकाचा ट्रक कमलेश तर दुसरा ट्रक नीरवच्या मालकीचा असल्याचे दस्तऐवजावरून पोलिसांना कळाले. पहिल्या ट्रकचा मूळ मालक (दस्तऐवजांच्या आधारे) विठ्ठलच्या मालकीचा असून, सचिन नावाच्या एजन्टच्या माध्यमातून विकत घेतल्याचे कमलेशने पोलिसांना सांगितले.

तर नीरवने जावेद नावाच्या एजन्टच्या माध्यमातून ट्रक खरेदी केल्याचे सांगितले. तांत्रिक तपासादरम्यान दोन्ही ट्रक टाटाने निर्मित केले नसल्याचे आढळले. मूळ चेसिस क्रमांकात बदल करून बनावट दस्तऐवजांच्या आधारे प्रादेशिक परिवहन विभागाच्या ग्रामीण कार्यालयात नोंदणी करण्यात आल्याचेही समोर आले.

तसेच या ट्रकची विक्री करून मूळ मालक, विमा कंपनी व शासनाचा कर बुडवून फसवणूक करण्यात आली. ७ मार्चला एपीएमसी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या ट्रक चोरीचे मोठे रॅकेट नागपुरात सक्रिय असून मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर या रॅकेटचाही पर्दाफाश होण्याची शक्यता खास सूत्रांनी वर्तविली.

यापूर्वीही घडला प्रकार

विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर आरटीओ चर्चेत आहे. पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली व मधप्रदेशातून चोरीच्या ट्रकचे नागपुरात चेचिस क्रमांक बदलविण्यात येत आहेत. अमरावती पोलिसांच्या तपासात पहिल्यांदा २०१८ मध्ये ही माहिती समोर आली होती. यावेळी याप्रकरणात शहर आरटीओच्या कार्यालयीन अधीक्षकावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT