Seven people with travel backgrounds were admitted to the medical Nagpur coorna news 
नागपूर

सहा वर्षांचा मुलगा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संशयित; सात जण मेडिकलमध्ये दाखल

केवल जीवनतारे

नागपूर : एका ४३ वर्षीय महिलेसह अवघ्या सहा वर्षांचा मुलाला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या संशयामुळे मेडिकलच्या पेइंग वॉर्डात बुधवारी (ता. ३०) दाखल करण्यात आले. या दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झाला. यामुळे तत्काळ मेडिकलमध्ये हलवण्यात आले. आता मेडिकलमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या संशयित रुग्णांची संख्या ७ झाली आहे.

लंडन प्रवासाची प्रार्श्वभूमी असल्याने त्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे संशयित असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. वर्धमानगर येथील ही महिला आहे. चार डिसेंबरला या महिलेने आरटीपीसीआर चाचणी केली. मात्र, बाधा नसल्याचे पुढे आले. मुंबईत आल्यानंतर पुन्हा एकदा रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. यावेळीही निगेटिव्ह अहवाल आला. यानंतर वर्धामानगर येथे केलेल्या चाचणीत कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले.

१६ डिसेंबरला खासगी प्रयोगशाळेतील चाचणीतून ही महिला बाधित असल्याचे निदान झाले. यानंतर त्यांनी गृहविलगीकरणात राहणे पसंत केले. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांना सूचना मिळताच त्यांनी पुन्हा एकदा मेडिकलमध्ये आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्ला दिला. २७ डिसेंबरला केलेल्या चाचणीत या महिलेस कोरोनाची बाधा झाल्‍याचे स्पष्ट झाले.

पुन्हा एकदा २९ डिंसेबरला खासगीत केलेल्या चाचणीत त्यांचा अहवाल कोरोनाबाधित आढलला. यामुळे त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यापाठोपाठ सहा वर्षांच्या मुलाचे वडील लंडनहून नागपुरात आले. त्यांच्या संपर्कात आल्याने या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. वडील आणि आता मुलगा दोघेही मेडिकलमध्ये दाखल आहेत. युरोप व इतर भागातून नागपुरात आलेल्या प्रवाशांपैकी आता ८ जणांना नव्या विषाणूची बाधा झाल्याचा संशय आहे.

आठ मृत्यू; ३६८ नवीन बाधितांची भर

जिल्ह्यात आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर ३६८ नवीन रुग्णांची भर पडली. दिवसभरात एकूण ५ हजार ७ संशयितांच्या चाचण्या झाल्या. ८ बाधित दगावले. ३६६ व्यक्तींनी आज कोरोनावर मात केली. जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ७३२ आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी, अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात

Bike Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जागीच ठार; डोक्याला गंभीर मार लागला अन्..

SCROLL FOR NEXT