नागपूर : मतिमंद व मूकबधिर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या वर्षा शंकरबाबा पापडकर व अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह रविवारी (२०) नागपूर येथे साजरा होत आहे. या विवाहात वर्षा हिचे कन्यादान वधुपिता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व आरती देशमुख करणार आहेत.
हेही वाचा - मराठी पाऊल पडते पुढे! महाराष्ट्राची युद्धकला आता जाणार मध्यप्रदेशात; महिला सशक्तीकरणास मिळणार बळ
मूकबधिर असलेल्या समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व ज्योत्स्ना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. ठाकरे यांनी आज समीर व वर्षा यांना विशेष निमंत्रित करून वर व वधू यांचे वरपिता म्हणून औक्षण करून लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी रिध्दी देशमुख यांनी नव वरवधुंचे स्वागत केले. अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादासपंथ वैद्य मतिमंद, मूकबधिर अनाथालय येथे २३ वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पोलिसांना सापडलेल्या मुलीचे संगोपन करून चिमुकलीचा तिचा आईवडिलांप्रमाणे सांभाळ करून तिला वडिलांचे नाव दिले. ती सहा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणाकरिता संत गाडगेबाबा निवासी मूकबधिर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले.
डोंबीवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरचे सुद्धा वझ्झर येथील अनाथालयात शंकरबाबा पापडकरांनी स्वत:चे नाव देऊन सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली. बालगृहातील वर्षा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुध्दा स्वावलंबी केले. त्यानंतरच दोघांच्या विवाहाला संमती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. सामाजिक दायित्व स्वीकारून ठाकरे यांनी वरपित्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.