Shivsena Shivsena
नागपूर

नेते बघ्यांच्या भूमिकेत : लढ म्हणायला कोणीच नाही; शिवसैनिक अस्वस्थ

जिल्हा प्रमुखांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि संपर्क प्रमुख बोलू देत नाहीत

राजेश चरपे

नागपूर : जिल्हा प्रमुखांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि संपर्क प्रमुख बोलू देत नाहीत अशी परिस्थिती शिवसेनेची असल्याने महापालिकेची निवडणूक (Municipal elections) लढण्यास इच्छुक असलेले शिवसैनिक (shivsena) चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

महापालिकेची निवडणुकीची (Municipal elections) केव्हाही घोषणा होऊ शकते. फेब्रुवारी महिन्यात महापालिकेचा कार्यकाळ संपतो आहे. कोरोनाचे संकट नसते तर एव्हाना निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली असती. याचा फायदा भाजपच्यावतीने (BJP) घेतला जात आहे. बोनस समजून महापौर दयाशंकर तिवारी बॅटिंग करीत आहेत. भाजपचे मायक्रो प्लानिंग सुरू आहे. निवडणूक जाहीर होताच उमेदवारांची नावे जाहीर करणे एवढेच काम भाजपने शिल्लक ठेवले आहे.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत बैठक घेतली. प्रमुख पदाधिकाऱ्यांना यासाठी बोलावले होते. स्थानिक परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. उमेदवारांचा आतापासून शोध घेण्याचे आदेश पटोले यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विस्ताराकडे लक्ष देत आहे. छोटे-छोटे मेळावे, कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सक्रिय केले जात आहे. राष्ट्रवादीने (National Congress Party) नेते प्रफुल पटेल यांनी आघाडी, युतीसाठी कोणाचा पाया पडू नका असा सल्ला देऊन स्वबळावर निवडणूक लढण्याचे सुचवले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पवित्रा बघता महाविकास आघाडी महापालिकेत कायम राहील याची शाश्वती नाही. काँग्रेसने आधीच आम्ही आपल्या बळावर लढू असे आधीच जाहीर केले आहे.

शिवसेनेत (shivsena) महापालिका निवडणुकीबाबत साधी चर्चाही होताना दिसत नाही. आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना नागपूरचे संपर्क प्रमुख करणे अनेक माजी पदाधिकाऱ्यांना रुचलेले नाही. त्यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीवरून अनेकांनी जाहीर नाराजी दर्शवली. माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांनी स्वतःला दोन हात लांबच ठेवले आहे.

माजी उपमहापौर किशोर कुमेरिया आणि मंगला गवरे हे दोनच नगरसेवक शिवसेनेकडे आहे. मंगला गवरे या पक्षात राहतीलच यांची शाश्वती नसल्याचे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे. माजी नगरसेवक बंडू तळवेकर, किशोर पराते, अलका दलाल असे काही मोजके शिवसैनिक स्वबळावर निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने सोबतीला त्यांना दोन उमेदवारांची गरज भासणार आहे. साथीला तोलामोलाचा उमेदवार नसेल तर आमचे कठीण आहे असे शिवसैनिकांचेच म्हणणे आहे.

पदे घेणाऱ्यांनीच पुढाकार घ्यावा

नागपूर सुधार प्रन्यास आणि शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांवरून जुन्या आणि नव्यांमध्ये चांगलाच वाद झाला होता. एकमेकांच्या मुंबईपर्यंत तक्रारी पोहोचल्या. वरिष्ठ नेत्यांनी सर्वांनाच तंबी दिल्याने आता कोणी काहीच बोलायला तयार नाहीत. काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिक घेतली आहे. ज्यांनी पदे घेतली त्यांनीच पुढाकार घ्यावा असे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT