नागपूर

विदर्भात सेनेला धक्का; शेखर सावरबांधे जाणार राष्ट्रवादीत!

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शिवसेनेचे उपमहापौर व जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे हे शिवसेनेला रामराम करणार आहे. तब्बल १९ वर्षे ते शिवसेनेसोबत होते. मात्र, काही दिवसांपासून ते चांगलेच पक्षावर नाराज होते. अशात शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे नागपुरात येऊन गेल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सावरबांधे हे पक्ष सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

शेखर सावरबांधे यांची अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख आहे. ते १९ वर्षांपासून शिवसेनेसोबत होते. मात्र, शिवसेनेत बाहेरून आलेल्यांना संधी दिली जाते अन् जुन्या शिवसैनिकांना डावलले जात असल्याने ते नाराज होते. नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विदर्भात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

यापूर्वी अशोक शिंदे यांनी शिवसेनेला रामराम करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जवळपास ३० वर्षे शिवसेनेत होते. मात्र, शिवसेनेत बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात आहे. जुन्या शिवसैनिकांना डावलले जात आहे. आता पक्षाला आपली गरज नसल्याचे दिसते, असा आरोप करीत सावरबांधे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

शिवसेनेत असताना त्यांनी दक्षिण नागपूर विधानसभेसाठी दावेदारी दाखल केली होती. मात्र, अचानक पक्षाने त्यांचे तिकीट कापले होते. यामुळे ते चांगलेच नाराज झाले होते. याच नाराजीतून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काही काळ अलिप्त राहिल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत सक्रिय झाले होते. मात्र, दुसऱ्यांदाही त्यांना तिकीट नाकारली गेली. यामुळे ते शिवसेनेवर चांगलेच नाराज झाले होते. यातून त्यांनी शिवसेनेला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस

शेखर सावरबांधे हे सुरुवातील काँग्रेसमध्ये होते. यावेळी ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये ते सक्रिय होते. मात्र, सतीश चतुर्वेदी यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, येथेही त्यांना न्याय मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT