shopkeepers selling alcohol to minors anywhere in the village you can get liquor Sakal
नागपूर

Nagpur News : अल्पवयीनांना दारू देण्यास दुकानदारांची ‘हा’ ?

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा : ‘पुणे हिट अँड रन’ प्रकरणामुळे अल्पवयीनांना दारू देणाऱ्या पब व बारवर कारवाई झाली. परंतु बार, दारूच्या दुकानात अल्पवयीनांना दारू मिळणे ही सामान्य बाब आहे. नरखेड तालुक्यातील देशी विदेशी दारू दुकाने व बार यांचा आढावा घेतला असता कसलीही रोकटोक न करता अल्पवयीनांना दारू मिळत असल्याचे सत्य समोर आले आहे.

अल्पवयींना दारू देण्यास दुकानदारांची कधीच ‘ना’ नसते, असे दिसून आले आहे.अल्पवयींना त्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना नसतानादेखील त्यांना बिनधास्त दारू विक्री केली जाते. याबाबत आजपर्यंत एकही बार किंवा दारू दुकानावर अबकारी विभागाकडून कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. अबकारी विभागाचे अधिकारी महिन्याच्या ठरलेल्या तारखेला बार व दारू दुकानांना भेट कशासाठी देतात, त्यांच्या या भेटी ‘अर्थपूर्ण’ असतात का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागात शहरी संस्कृतीचा शिरकाव झाला. ग्रामीण भागात बारची संख्या वाढली. नरखेड तालुक्यात १८ बार व १२ देशी विदेशी दारूची दुकाने आहेत. सर्वच बार व दारू दुकानात दारू विक्रीचे नियम धाब्यावर बसवून दारूची सर्रास विक्री केली जाते. नियमाप्रमाणे बारमध्ये बसून दारू पिण्याकरिता किंवा खरेदी करण्यासाठी किंवा देशी विदेशी दारू दुकानातून दारू खरेदी करण्यासाठी अबकारी विभागाकडील परवाना असणे आवश्यक आहे. परंतु हा नियम सर्रास पायदळी तुडवून दारू विक्री केली जाते. दारू विक्रीनंतर ग्राहकाला बिल देणे आवश्यक आहे.

परंतु एकही बार किंवा दारू दुकानात खरेदीदाराला खरे बिल दिले जात नाही. कच्चे बिल देण्यात येते. बिलामध्ये परवानाधारक ग्राहकांचा परवाना क्रमांक टाकणे आवश्यक असते. परंतु ग्राहकाकडे परवानाच नसल्याने कोणीही त्याबाबत ओरड करीत नाही.

मग `ही’ डोळेझाक कशासाठी?

दारू दुकान व बार चालकांना दारू विक्रीचा दैनंदिन संपूर्ण रेकॉर्ड खरेदीदाराच्या परवान्यासह ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता काही परवानावरच विक्री दाखवून रेकॉर्ड मेंटेन करण्यात येते. याबाबत अबकारी विभागाला पूर्ण माहिती आहे. परंतु दारू दुकानदार व बार मालकासोबत असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे काहीही कारवाई करीत नाही.

बार किंवा दारू दुकानाचा परवाना घेताना बार, दारू दुकानाच्या आंतरिक व्यवस्था कशी असेल, याबाबत नकाशा अबकारी विभागाकडे दाखल करण्यात येतो. एकदा परवाना मिळाला की नियमबाह्य आंतरिक व्यवस्था बदलविण्यात येते.

ग्रामीण भागात अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे

शासकीय दारूविक्री परवाना असलेली दुकाने काही मोठ्या गावात आहेत. तेथून अवैध दारू विक्रेत्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून परवानाधारक दुकानदार ग्रामीण भागात देशी दारूचा विक्रीकरिता पुरवठा करतात. छोट्या गावामध्ये सहजपणे देशी दारू उपलब्ध होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT