Mucormycosis Esakal
नागपूर

मेडिकलमध्ये पॉझोकोनाझोल गोळ्यांचा तुटवडा; बुरशीच्या आजारावर प्रभावी

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनातून (coronavirus) बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucor mycosis) हा बुरशीजन्य आजाराचे थैमान सुरू झाले आहे. जिल्ह्यात १,१०० रुग्ण बुरशीच्या आजाराचे आढळून आले आहेत. यापैकी ८५ जण दगावले आहेत. या आजारावरील अँटी-फंगल इंजेक्शन ‘अम्फोटेरिसिन-बी’चा (Amphotericin-B) तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार (Black market of injections) होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत इंजेक्शनचे वितरण होत आहे. नुकतेच इंजेक्शनऐवजी शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर वापरल्या जाणाऱ्या पॉझोकोनाझोल गोळ्यांचाही तुटवडा (Shortage of pozoconazole tablets) निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. (Shortage-of-posaconazole-tablets-in-medical-Hospital)

कोरोनावरील उपचारात स्टेरॉईडचा वापर झाल्यानंतर श्वसनयंत्रणेवर बराच काळ, मधुमेह असलेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजाराचा धोका आहे. अलीकडे या आजाराच्या रुग्णांची संख्या नागपुरात वाढत आहे. सध्या मेडिकलमध्ये या आजाराने बाधित असलेले ११० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. यातील ५० जणांवर शस्त्रक्रिया झाली आहे.

मात्र, या रुग्णांना आवश्यक इंजेक्शन ‘अम्फोटेरिसिन-बी’ मिळणे कठीण झाले आहे. या इंजेक्शनला पर्याय म्हणून तसेच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर पॉझोकोनाझोल या गोळ्या देण्यात येतात. मात्र, अनेक रुग्णांच्या हाती चिठ्ठी देण्यात येत आहे. मेडिकलमध्ये पॉझोकोनाझोल गोळ्यांचा तुटवडा आहे. त्याचप्रमाणे औषधांच्या दुकानातही हे मिळत नाही.

खासगी रुग्णालयांमधील रुग्णांना गोळ्या

जिल्हा प्रशासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अ‍ॅम्फोटेरिसिनची इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. म्हणूनच पोसॅकोनाझोल गोळ्या आवश्यक नाहीत. हे औषध खूप महाग आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर इंजेक्शनऐवजी पोझकोनाझोल गोळ्या वापरण्यात येत आहेत. यामुळे बाजारात या गोळ्या मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

सद्या मेडिकलमध्ये ‘अम्फोटेरिसिन-बी’ इंजेक्शनचा पुरवठा बऱ्यापैकी आहे. यामुळे क्वचित पॉझोकोनाझोल गोळ्या वापरण्यात येतात. यामुळे या गोळ्या नसल्यातरी चालतात. मात्र, खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर

(Shortage-of-posaconazole-tablets-in-medical-Hospital)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT