नागपूर

Shubham Dubey: किटसाठी पैसे नव्हते, आता कोट्यवधीचा धनी! आयपीएलमधील जॅकपॉटने बदलणार क्रिकेटपटू शुभम दुबेचे आयुष्य

विदर्भाचा युवा क्रिकेटपटू शुभम दुबेने क्रिकेटमध्ये करिअरचे लहानपणी स्वप्न पाहिले होते. मात्र गरिबी व आर्थिक चणचणीमुळे त्याला अनेक अडथळे आले.

सकाळ डिजिटल टीम

Shubham Dubey IPL: विदर्भाचा युवा क्रिकेटपटू शुभम दुबेने क्रिकेटमध्ये करिअरचे लहानपणी स्वप्न पाहिले होते. मात्र गरिबी व आर्थिक चणचणीमुळे त्याला अनेक अडथळे आले. एकेकाळी तर त्याच्याकडे क्रिकेट ग्लोव्हज व किट खरेदीसाठीही पैसे नव्हते. मात्र आता तोच शुभम कोट्यवधींचा धनी झाला आहे. आयपीएल लिलावातील बंपर ‘जॅकपॉट’ने त्याला एका रात्रीत कोट्याधीश बनविले.

चार दिवसांपूर्वी दुबईत झालेल्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने शुभमवर ५ कोटी ८० लाखांची बोली लावून संघात घेतले. शुभमबाबत अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी, क्रिकेटच्या जाणकारांना व शुभमचा आक्रमक खेळ जवळून पाहणाऱ्यांना याचे अजिबात नवल वाटले नाही. त्यांच्या मते, तो याचा निश्चितच दावेदार होता.

आयपीएलसाठी निवड होईल, अशी शुभमलाही अपेक्षा होती. मात्र इतकी मोठी रक्कम मिळेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. उल्लेखनीय म्हणजे, शुभमने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली चषक टी-२० स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये १८७ च्या स्ट्राईक रेटने २२१ धावा ठोकून फ्रेंचाईजीचे लक्ष वेधले होते.

वैशालीनगर, कमाल चौक येथे राहणाऱ्या २७ वर्षीय शुभमचा गरिबीपासून कोट्यवधीपर्यंतचा प्रवास अतिशय कठीण व संघर्षपूर्ण राहिला आहे. त्याचे वडील बद्रीप्रसाद हे कधीकाळी पानठेला चालवायचे, तर आई अर्चना गृहिणी आहे.(Latest Marathi News)

गरिबीमुळे त्याच्याकडे क्रिकेटची किट घेण्यासाठी पैसे नसायचे. त्यामुळे दुसऱ्याची किट मागून तो क्रिकेट खेळायचा. या अडचणीच्या काळात त्याला ॲडव्होकेट एकादश संघाचे मालक ॲड. सुदीप जैस्वाल यांनी मदतीचा हात दिला. महागड्या क्रिकेट साहित्यापासून अगदी डायटपर्यंतची शुभमची संपूर्ण काळजी ॲड. जैस्वाल यांनी स्वतःकडे घेतली होती. शिवाय त्यांनी त्यांच्या संघाकडूनही खेळण्याची शुभमला संधी प्रदान केली. शुभमही ही बाब मोठ्या मनाने कबूल करतो. आज मी जे काही आहे, ते ॲड. जैस्वाल यांच्यामुळेच असल्याचे त्याने सांगितले.

त्या काळात शुभम पैसे कमावण्यासाठी टेनिसबॉल क्रिकेट खेळायचा. अशावेळी विदर्भाचा माजी यष्टीरक्षक अनिरुद्ध चोरेने मुंबईतील टाइम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला मदत केली. या माध्यमातून शुभमला दर महिन्याला दहा हजार रुपये मिळायचे. या मदतीचीही आयुष्यात खूप मदत झाल्याचे शुभमने सांगितले. याशिवाय रॉयल क्रिकेट असोसिएशनचे रोहित कैसलवार व इरफान रज्जाक यांनीही त्यांच्या क्लबमध्ये खेळण्यास मदत केली.

या सर्वांनी वेळोवेळी मदतीचा हात दिल्यामुळेच शुभमचे आयपीएलचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. विदर्भ संघात निवड झाल्यानंतर शुभमचे दिवस पालटले. आता आयपीएलमध्ये लागलेल्या बंपर ‘जॅकपॉट’ने शुभमची गरिबी तर दूर झालीच, शिवाय भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT