Gold-Silver Price Today  Sakal
नागपूर

Gold-Silver Price Today : सोने चांदीच्या दरात झाली मोठी वाढ,सोने ७५ हजाराकडे, चांदी ९० हजार रुपयांवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. यामुळे ग्राहकांच्या खिसा हलका होत आहे. गेल्या पाच दिवसात नागपुरात सोन्याच्या दरात १२०० रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो १६०० रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या करात सवलत दिल्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आता पुन्हा दरांचा आलेख वाढू लागला आहे.

गेल्या पाच दिवसात सोन्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याच्यामध्ये करण्यास सुरवात केली आहे. मागणी वाढूनही सोन्याचे दर हे चारच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर हे ७४, ५०० रुपये आहे. ते मंगळवारी ७३ हजार ३०० रुपये होते. पुढील काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ

गेल्या अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वाढत्या दरामुळे सोन्या चांदीची खरेदी करण्याकडे नागरिक पाठ फिरवत आहेत. पुढील काही दिवसात पुन्हा दोन्ही धातूच्या किमतीत वाढ झालेली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही धातूच्या दरात वाढ

एका बाजूला राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंच्या किमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चांदी ८७ हजार ८०० रुपये किलो होती. ती आता ८९ हजार ४०० रुपये झालेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदार यादी, इव्हीएम बॅलट युनिट पडताळणीसह केंद्रांची निश्चिती

Saptshringi Gad : सप्तशृंगी गड घाट रस्ता 23, 25 व 26 सप्टेंबरला सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत बंद राहणार..

Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील अपघातांचा आलेख घसरला, नागपूर विभागात मृतांचीही संख्या निम्म्यावर

Child Protein Diet : बालरोगतज्ज्ज्ञ म्हणतात... प्रथिनयुक्त आहार बालकांना ठेवेल निरोगी      

WTC 2023-25 Points Table: भारताविरूद्धच्या पराभवानंतर बांगलादेशची घसरगुंडी, तर रोहितसेना कोणत्या क्रमांकावर?

SCROLL FOR NEXT