Murder Murder
नागपूर

बहिणीला प्रियकरासोबत संबंध ठेवताना भावाने बघितले; मग...

अनिल कांबळे

नागपूर : प्रियकरासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना अचानक १२ वर्षीय भाऊ घरी आला. त्याने दोघांनाही नको त्या अवस्थेत बघितल्यामुळे आई-बाबाला सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे चिडलेल्या बहिणीने प्रियकराच्या मदतीने सख्‍ख्या भावाचा गळा आवळून खून केला. स्नेहल सागर सोनपिपळे (१८) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दृगधामना येथे राहणारे दाम्पत्य मोलमजुरी करतात. त्यांना १५ वर्षांची मुलगी आहे. मुलगा सहावीत तर मुलगी रिया (बदललेले नाव) दहावीला आहे. रियाचे वस्तीत राहणारा स्नेहल याच्याशी प्रेमसंबंध आहे. दोघांच्याही प्रेमसंबंधाची वस्तीत चर्चा आहे. आई-वडील घरी नसल्यास दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते.

सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बहिणीने भावाला काही पैसे देऊन दुकानात खाऊ घेण्यासाठी पाठविले. भाऊ दुकानात जाताच स्नेहल त्याच्या घरी आला. काही वेळातच भाऊ घरी आला त्यावेळी दार बंद होते. तो दार ढकलून आतमध्ये आला. त्यावेळी बहीण आणि प्रियकर बेडवर नग्न अवस्थेत दिसून आले. याबाबत आई-वडिलांना सांगणार असे मुलाने बहिणीला म्हटले. त्यामुळे दोघेही घाबरले. दोघांनीही मुलाची समजूत काढली. परंतु, मुलगा ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे बहीण घाबरली. दोघांनीही मुलाला पकडले. बहिणीने भावाचे हात पकडून ठेवले तर स्नेहलने ओढणीने त्याचा गळा आवळला.

शेजाऱ्यांची दिशाभूल

भावाचा खून केल्यानंतर तिने मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलविले. ‘भाऊ दुकानातून वाचवा... वाचवा असे ओरडत घरी आला. काही लोकांनी मला मारहाण केली. त्याला पाणी दिले. पाण्याचे दोन घोट घेतल्यानंतर तो बेशुद्ध पडला’ अशी माहिती तिने शेजाऱ्यांना दिली. तिच माहिती आई-वडिलांना दिली. उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. वाडी पोलिसांना ही माहिती समजताच पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मुलाच्या गळ्यावर काही निशान होते. त्याचप्रमाणे डोळ्याजवळ एक जखम होती. त्यावरून त्याला मारहाण करण्यात आली परंतु, कुणी मारहाण केली हे समजून येत नव्हते.

सीडीआरवरून झाला खुलासा

मुलाची बहीण पोलिसांना वेगवेगळी माहिती देत होती. त्यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी आजूबाजूच्या दुकानात चौकशी केली. चौकशी दरम्यान बहिणीचे स्नेहलसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे पोलिसांनी बहिणीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याचा सीडीआर काढला. त्यात तिने अनेकदा स्नेहलला फोन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बहिणीवर लक्ष केंद्रीत करून तिची सखोल चौकशी केली असता ती फुटली आणि सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी स्नेहल यास ताब्यात घेतले. त्यानेही खुनाची कबुली दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून स्नेहल यास अटक केली. मंगळवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT