Jaipal Patel and Lokesh Joshi sakal
नागपूर

Accident : सोमवार ठरला घातवार! समारंभातून परतताना काळाची झडप; तीन अपघातांत सहा ठार

आठवड्याचा पहिला दिवस सोमवार नागपूर जिल्ह्यासाठी घातवार ठरला. सोमवारी शहरासह जिल्ह्यात तीन अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - आठवड्याचा पहिला दिवस सोमवार नागपूर जिल्ह्यासाठी घातवार ठरला. सोमवारी शहरासह जिल्ह्यात तीन अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. यात दोन मायलेकीसह पोलिस व एका चिमुकल्याचा समावेश आहे. यातील पाच जण लग्न व साक्षगंधावरून परतत असताना त्यांना काळाने गाठले. तर चिमुकला रिसेप्शनची आतषबाजी पाहण्यासाठी जात असताना त्याला वाहनाने चिरडल्याने तिन्ही ठिकाणी लग्नकार्य संबंधित कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

वाहनाच्या धडकेत मायलेकीसह ३ ठार

नागपूर - साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर बसलेल्या मायलेकीसह तिघांचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी ठाण्यांतर्गत नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जंगेश्वर गावाजवळ सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सुचिता सुधीर दांडेकर (४०), खुशी ऊर्फ समृद्धी सुधीर दांडेकर (१६) रा. हिंगणघाट, वर्धा आणि पुणिराम येनूरकर (६०) रा. गिरड, अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी पुणिराम यांच्या नातेवाईकाकडे साक्षगंधाचा कार्यक्रम होता. यासाठी ते मुलगी सुचिता आणि नात खुशी हिच्यासह नागपूरला आले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून सकाळी तिघेही एमएच-३२/एएम-१९९६ क्रमांकाच्या दुचाकीने गिरडला जाण्यासाठी निघाले. नागपूर-चंद्रपूर महामार्गाने बुटीबोरी परिसरातून जात असताना जंगेश्वर गावाजवळ मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

तिघेही उसळून खाली पडले. त्याच दरम्यान वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने पुणिराम यांचा जागीच मृत्यू झाला. सुचिता आणि खुशी या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी धाव घेतली.

घटनेची माहिती पोलिसांना देऊन जखमी मायलेकीला बुटीबोरीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलिसांनी पुणिराम यांचा मुलगा अमित येनूरकरच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

लग्न समारंभातून परतताना पोलिसासह दोघांचा मृत्यू

कोदामेंढी (मौदा) - लग्न समारंभ आटपून नागपूरला परतताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. यात वाठोडा ठाण्यातील पोलिसासह दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री मौदा नजीकच्या एसएमएस पेट्रोल पंपजवळ घडली.

नागपूर येथील वाठोडा पोलिस ठाण्याचे अंमलदार जयपाल देवचंद पटले (वय ५७) व लोकेश विजयराव जोशी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत. जयपाल देवचंद पटले यांचा धाकटा भाऊ सोपान पटले यांच्या मुलीचे शिवनी येथे (ता. २८) लग्न होते.

लग्न उरकून ते दोघेही रात्री दहाच्या सुमारास विगो मोपेड या (क्रमांक एमएच ४९ ए ३१३०) दुचाकीने मौदा मार्गाने नागपूरकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील एसएमएस पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने मोपेडला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मौदा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून नातेवाइकांना कळविले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.अमलदार पटले यांना दोन मुली आणि इतर लोकेश जोशी यांना एक मुलगी आणि एक भाऊ आणि आई- वडील आहेत. मौदा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास एएसआय नामदेव पुजारी, एपीआय नीतेश डोर्लीकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT