नागपूर : भटक्या श्वानांचे लहान मुले व नागरिकांवर होणारे हल्ले काही कमी झालेले नाही. शहर असो वा ग्रामीण भाग अनेक उपाययोजना करूनही हल्ले होतच आहेत. यामुळे अनेकांना जखमी व्हावे लागते तर काहींचा जीव जातो. अशीच एक घटना शनिवारी (ता. ११) नागपूर ग्रामीणमध्ये घडली. भटक्या श्वानांनी (dog) केलेल्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा जीव (death) गेला. (small boy dies in attack by stray dogs in Nagpur rural)
प्राप्त माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारा विराज जयवार नावाचा चिमुकला घराबाहेर खेळत होता. विराज घराबाहेर खेळत असताना भटक्या श्वानांनी त्याच्यावर हल्ला चढवला. श्वानांनी विराजचे लचके तोडायला सुरुवात केली. मुलगा रडत असल्याचे बघून घरचे बाहेर आले. तेव्हा त्यांना श्वानांनी हल्ला केल्याचे समजले.
कुटुंबीयांनी रक्तबंबाळ अवस्थेत विराजला रुग्णालयात दाखल नेले. मात्र, डॉक्टरांनी विराजला मृत (death) घोषित केले. विराज कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने जयवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे चिडलेल्या नागरिकांनी भटक्या श्वानांचा (dog) बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.