file 
नागपूर

कामठीवासींसाठी आता दिलासादायक बातमी, इतक्या रुग्णांनी केली कोरोनावर मात....

विजयकुमार राऊत

कामठी (जि.नागपूर) : गेल्या दोन महिन्यांपासून कामठी तालुका नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा `हॉटस्पॉट’ ठरला. येथील रुग्णसंख्येने एक हजारचा आकडा पार केला. दरदिवशी बाधितांची संख्या भरमसाठ वाढत असताना तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णसंख्या वाढीवर असताना अचानक सोमवारी आलेल्या एका बातमीने कामठीवासींना आशेचा किरण दिसू लागला आहे. हजारावर पोहोचलेली रुग्णसंख्या रोडावत चालली असून आज फक्त १४ रुग्ण आढळले, तर ३५ रुग्ण आज पुन्हा घरी परतले. तालुक्यात तब्बल ८४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचल्याने तालुका प्रशासनासह नागरिकांना सुखद दिलासा मिळाला आहे.

कामठीत आज आढळले १४ पॉझिटिव्ह
 कामठी तालुक्यात आज फक्त १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्याची रुग्णसंख्या अकराशे दोन झाली. मृत्यूसंख्या ४२ वर पोहोचली आहे. आज ३५ रुग्णांनी कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. आजपर्यंत तब्बल ८४८ बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात करत कामठी तालुका प्रशासनाला सुखद दिलासा दिला आहे. तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या  मोठ्या झपाट्याने कमी होत असून आज फक्त १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात ग्रामीण भागातील सात यामध्ये खसाळा, पांजरा, भिलगाव येथील प्रत्येकी दोन तर गुमथी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच शहरातील विविध भागातील सात रुग्णांचा समावेश आहे. मागील एक महिन्यात १८ महिला व २४ पुरुष असे सतत एकामागे एक ४२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात शहरातील विविध भागातील २६, ग्रामीण भागातील १३ यात सर्वाधिक येरखेडा येथील सात आहेत. छावणी परिषद क्षेत्रातील तीघांचा मृत्यू झाला आहे. यातील तब्बल २८ व्यक्ती पन्नास वर्षांवरील आहेत. आजपावेतो तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११०२ आहे. त्यातील ८४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २१५ रुग्ण अॅक्टिव आहेत. तर नागरिकांनी मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता शासनाच्या गाईडलाईनचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

कळमेश्वरच्या एका पालिका पदाधिकाऱ्यासह १२ पॉझिटिव्ह
कळमेश्वरः कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यासह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येयील पॅथलॉजिस्ट व खासगी बॅंकेतील ३ कर्मचारी असे ६ रूग्ण पालिका क्षेत्रात आढळले. धापेवाडा येथे ६ रूग्ण पॉझिटिव्ह निघाले. सोमवारी १२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा २७० झाला आहे.  नगर पालिका कळमेश्वर-ब्राम्हणी क्षेत्रातील सावता मंदिर, वार्ड क्र.१ येथील एक, तसेच वार्ड क्र.११ येथील एक व बाहेरच्या तालुक्यातुन कामावर येणारे४ रूग्ण, असे मिळून ६ तर तालुक्यातील धापेवाडा येथील ६ रूग्ण असे मिळूण एकूण बारा रूग्ण आजज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले. सद्यस्थितीत पालिका क्षेत्रात १६१ रूग्ण तर तालुक्यात ११५ रूग्ण ,असे एकूण २७० पॉझिटिव्ह रूग्णसंख्या झाली आहे.

अधिक वाचाः नागपूर जिल्हयातील एकमेव या ‘हॉटस्पॉट’ तालुक्यात आतापर्यंतची मृत्यूसंख्या ४२...

रामटेक तालुक्यात ७ जण संक्रमित
रामटेकः तालुक्याच्या ग्राणीण भागातही कोरोना हातपाय पसरवू लागला आहे. ग्रामीण भागातील लोकांची बिनधास्त जीवनशैली आता भारी पडू लागल्याचे दिसत असल्याने ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनी आता सावध राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले. तालुक्यातील मनसर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आज मनसर येथील ५० वर्षीय महिला व तिचा ३८ वर्षीय  मुलगा दोघेही बाधित निघाले. ते दोघेही सौंसर (म.प्र.)येथे गेले होते. त्याठिकाणी ते बाधित इसमाच्या संपर्कात आले. त्यांची आज स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. पाचगाव (वाहीटोला) येथील एक १९  वर्षीय  तरूण एका बाधित सलूनवाल्याकडे कटींगसाठी गेला होता. सलूनवाल्याच्या संपर्कातील लोकांच्या यादीत या तरूणाचे नाव होते. त्याची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना कोविड केअर सेंटर येथे पाठविण्यात आले. भंडारबोडी प्रा.आ.केंद्रांतर्गत नवेगाव चिचदा येथील काही कामगार १० दिवसांपूर्वी सावनेर यैथे बोरिंगच्या कामासाठी गेले होते. त्यापैकी ३ जण आज मालकाच्या गाडीने नवेगावला परत आले. त्यांना सोडून मालक निघून गेला. या तिघांची स्वॅब टेस्ट केली असता त्यापैकी दोघेजण संक्रमित निघाले. उमरी येथेही एकजण संक्रमित आढळला. मानापूर येथील एक जण संक्रमित निघाला.

भिवापूरात दोन पॉझिटिव्ह
भिवापूर :सोमवारी येथील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या रॅपीड इन्टिजेन चाचणीत शहरातील वेगवेगळ्या भागात राहणारे दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यासोबतच तालुक्यातील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १० वर पोहचली आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यात पंचायत समितीमधील एका कर्मचाऱ्याचा समावेष आहे. दुसरा रुग्ण नगरपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या वस्तीतील रहिवासी आहे.

मौद्यात आढळले दोन रुग्ण
मौदाः आज तालुक्यात दोन पॉझिटिव्ह मिळाले असून आतापर्यंत ४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी ३२ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुका प्रशासनातर्फे नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या  आहेत.

    
संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT