Sparrow e sakal
नागपूर

चिमण्या अन् कावळे हरवले कुठे? कबुतरानं थाटले शहरातील घरात घरटे

राजेश रामपूरकर

नागपूर : विविध पक्षी, दुर्मिळ वृक्ष, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे यांच्यासाठी शहर प्रसिद्ध होते. पण कालाच्या ओघात या जैवविविधतेला (biodiversity) ग्रहण लागले. शहरातील नैसर्गिक अधिवासच नष्ट होत असल्याने चिमणी (sparrows), कावळा (crows), बुलबुल, पोपटासह सुतार या व अन्य पक्षांनी शहराला रामराम ठोकला. शहरातील अनेक भाग चिवचिवाटाला पारखे झालेले आहेत. असेही दिवस अनुभवले आहेत की चिमणी,कावळा,पोपट,भोर आदी पक्षी अंगणात बागडायचे. पण आता येणाऱ्या पिढ्यांना या पक्षांची ओळख करून देण्यासाठी शहराबाहेर जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (sparrows and crows not seen in nagpur)

चिमण्या मानवी वस्तीजवळ राहतात. चिमण्यांची घरटी घरातील माळ्यावर, अगदी विजेच्या ट्यूबच्या पट्टीवरही आढळतात. चिमण्या रात्री झाडांवर बसत असल्या, तरी घरटी मात्र झाडावर करत नाहीत. अलीकडील काळात म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षांत चिमण्यांना घरटी बनवण्याची सुविधा आपण संपवल्याने त्यांचे स्थलांतर होत आहे.

नागपूर हे हिरव्या झाडीत लपलेले शहर दिसत असले तरी कावळे, बुलबुल, मैना, चिमण्यांची संख्या कमी होत आहे, असे पक्षीमित्रांचे निरीक्षण आहे. पूर्वी शहरातील नागनदी, सिव्हिल लाइन्स, मध्यवर्ती कारागृह, महाराजबागचा परिसरातील झाडांवर चिमण्यांचे थवे मोठया प्रमाणात दिसायचे. कारण या भागात विशाल झाडे होती. तसेच शहरातील अनेक भागातील जुनी घरे पडून तेथे गुळगुळीत सिमेंटचे प्लास्टर असलेल्या इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे पक्ष्यांना घरटी करण्यासाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे चिमण्या, कावळे, मैना, बुलबुल आता शहराबाहेर, परंतु कमी विकसित अशा भागाकडे स्थलांतरित झाल्या आहेत.

शहरात घरटी करण्यास जागाच राहिली नसल्याने कावळे, चिमण्यांसह इतर पक्ष्यांचे आक्षयस्थळे संपुष्टात आल्याने त्यांनी आपला मुक्काम शहराबाहेर हलविला आहे.
-डॉ. अनिल पिंपळापूरे, संस्थापक सदस्य, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना
जुनी घरे तोडून अत्याधुनिक पद्धतीच्या बांधकामात झालेली वाढ, स्थानिक वृक्षांची तोड, पक्ष्यांचे खाद्यही शहराच्या विकासासोबत कमी झाले आहेत. त्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर वाढले आहे.
अविनाश लोंढे, मानद वन्यजीव रक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT