ST employee pay issue remain Govt should make provision for funding Sakal
नागपूर

ST Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम; निधी देण्यात सरकारची बनवाबनवी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे एसटी महामंडळातील ८७ हजार कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन रखडले आहे. वेतन उशिरा झाल्यास त्याला केवळ सरकारची बनवाबनवी कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)मधील कर्मचारी-अधिकाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वर्षानुवर्षे वेतन मिळत आहे. मात्र, हल्ली संप व कोरोना पासून कधीच वेळेवर वेतन मिळालेले नाही. संपानंतर न्यायालयात सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सात तारीख उलटली तरी निदान दहा तारीख पर्यंत वेतन मिळत आहे.

तशी हमी राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली आहे. मात्र, दहा तारीख उलटूनही वेतन झाले नाही. एकीकडे वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम एसटीला दर महिन्याला देऊ, असे लेखी आश्वासन त्री सदस्यीय समितीने उच्च न्यायालयात दिले होते. त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू असून दर महिन्याला काही ना काही अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप बरगे यांनी केला.

खास बाब म्हणून निधी देण्यात यावा

दर महिन्याला अजूनही साधारण १८ ते २० कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला कमी पडत आहे. अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करण्यात न आल्याने एसटीचा गाढा पुढे चालणे अवघड आहे. त्यामुळे खास बाब म्हणून सरकारने तत्काळ निधी द्यावा, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ReNew Company: नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातमीत किती तथ्य? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

IND vs BAN: विराट आऊट... रोहित नाराज; मात्र चेन्नईचे चाहते सुस्साट, पाहा व्हिडिओ

Indian Billionaire: 32,615 कोटींची संपत्ती अन् देतोय 600 रुपये वाचवण्याचा सल्ला; कोण आहे हा उद्योगपती?

IPS Shivdeep Lande Resign: बिहारचे सिंघम शिवदीप लांडेंचा राजीनामा; प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ

Worli Vidhan Sabha: वरळीतून अमित ठाकरे नव्हे तर मनसेच्या 'या' फायरब्रँड नेत्याला मिळणार तिकीट; राज ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ

SCROLL FOR NEXT