Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : पती-पत्नी असल्याचे दाखवून बुडविला मुद्रांक शुल्क; दोघांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर शहरातील आनंदम सिटीमध्ये दोन फ्लॅट खरेदी करताना दुय्यम निबंधक कार्यालयात पती-पत्नी असल्याचे सांगून मुद्रांक शुल्क बुडविले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शहरातील आनंदम सिटीमध्ये दोन फ्लॅट खरेदी करताना दुय्यम निबंधक कार्यालयात पती-पत्नी असल्याचे सांगून मुद्रांक शुल्क बुडविले. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक राजू गंगाधर गाजर्लवार (वय ५७, रा. उत्थाननगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुनम मनसुखलाल राजकोटीया आणि सागर देविदास खरात अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२३ मध्ये गोदरेजच्या आनंदम वर्ड सिटी टावरच्या ई ब्लॉकमध्ये अठराव्या आणि पहिल्या मजल्यावर पुनम राजकोटीया यांचे दोन फ्लॅट असून त्यापैकी ५० टक्के हिस्सा हा सागर खरात यांच्या नावे केल्याची बक्षिसपत्र केले होते.

दरम्यान तो हिस्सा आपल्या नावे करण्यासाठी त्यांनी सदरमधील दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान अर्ज करताना, त्यांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये सागर हे त्यांचे पती असल्याची बतावणी केली होती. १२ ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांनी या कागदपत्राच्या आधारे दोन्ही फ्लॅट आपल्या नावावर केले होते.

नियमाप्रमाणे महाराष्ट्र मुद्रांक अनुच्छेद ३४ नुसार रक्ताच्या नात्यात असलेल्या व्यक्तीला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येते. यासाठी पुनम राजकोटीया यांनी बनावट कागदपत्राचा आधार घेतला. दरम्यान कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र खोटे असल्याची बाब समोर आली.

त्यातून त्यांनी सरकारचे सरकारचे १४ लाख ३८ हजार १७५ रुपये असा ७ टक्के मुद्रांक शुल्क बुडविल्याचे आढळून आले. त्यामुळे सहदुय्यम निबंधकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची चौकशी करीत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT