ST Mahamandal sakal
नागपूर

ST Mahamandal : वादात अडकला ‘लालपरी’चा प्रवास ;चालक-वाहकांच्या मनमानीमुळे विद्यार्थी -प्रवाशी त्रस्त

‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ तसेच प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य घेऊन अहोरात्र धावणारी प्रवाशांची अत्यंत विश्वासू व आवडती एकमेव ‘लालपरी’ आहे.

सकाळ वृत्तसेवा

काटोल : ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ तसेच प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य घेऊन अहोरात्र धावणारी प्रवाशांची अत्यंत विश्वासू व आवडती एकमेव ‘लालपरी’ आहे. मात्र बहुतांश चालक वाहकांच्या मनमर्जी व अडेलतट्टूपणाचा फटका एसटी महामंडळाच्या तिजोरीला बसत आहे. त्यांचा प्रवाशाप्रति असलेला हा व्यवहार उलटपक्षी अवैध प्रवासी वाहतुकीला चालना देणारा ठरत आहे. वाहक-चालकांच्या मनमर्जीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये एक जुलैपासून सुरू होत आहेत. याकरिता शाळेकरी विद्यार्थ्यांना बससेवेचा पुरेपुर फायदा मिळावा. तसेच काटोल-नागपूर मार्गावरील महत्त्वाच्या मेटपांजारा बसस्टेशनवर जलद, साधारण सर्व बसेस थांबण्याचे निर्देश व थांबे असूनही अनेक चालक वाहकांच्या हेकेखोरीचा फटका मेंढेपठार-मेटपांजरा बसस्टेशनवरून प्रवास करणारे विद्यार्थी व प्रवाशांना बसत आहे.

मेटपांजरा बसस्टेशनवरून जाणाऱ्या- येणाऱ्या सर्व एसटी बसेस मेटपांजरा येथे थांबतील, अशी सूचना असूनही सूचनांना केराची टोपली दाखविली जात आहे. नागपूर व अमरावती आगारातील काटोल-नागपूर मार्गावरील एसटी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससे मेटपांजरा येथे थांबतील, असे आदेश देण्यात यावे, अशी मागणी काटोल तालुका मनसेचे अध्यक्ष व मेटपांजरा ग्रा.पं.चे सरपंच अनिल नेहारे यांनी केली.

'मेटपांजरा बसस्टेशनवर सर्व बसेस थांबवाव्या’

निवेदनात सर्व प्रवासी बससेवा मेटपांजरा बस स्टेशनवर देण्यात यावी, या मागणीची पूर्तता न झाल्यास अखेर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. काटोल आगार व्यवस्थापकांना निवेदन देतेवेळी काटोल पंचायत समितीचे उपसभापती निशिकांत नागमोते, आजनगावच्या सरपंच अश्विनी नागमोते, मेंढेपठारचे सरपंच अभय कोहळे, संजय गजबे, प्रफुल्ल क्षिरसागर, दिलीप हिरूटकर, पवन कोरडे, ईश्वर गायकवाड उपस्थित होते.

या प्रकरणी काटोल आगाराचे आगार व्यवस्थापक अनंत तातर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ज्या ज्या प्रवासी बसेसना मेटपांजरा बस स्टेशनवर थांबे दिले आहेत, त्या सर्व बसे त्या थांब्यावर थांबण्याच्या सूचेना दिल्या जातील. तक्रारी आल्यास संबंधित चालक वाहकांवरही नियमानुसार कार्यवाही केली जाईल. प्रवासी व लोकप्रतिनिधींनी सुद्धा एसटी महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक अनंत तातर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT