Drinking Water sakal
नागपूर

Summer Heat : फिरणे टाळा पाणी प्या

उन्हाच्या तीव्र चटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला नवतपा शनिवारपासून सुरू होताच सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतोय की काय, असेच चित्र उपराजधानीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - उन्हाच्या तीव्र चटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला नवतपा शनिवारपासून सुरू होताच सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतोय की काय, असेच चित्र उपराजधानीत आहे. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत असून, सोमवारी पाऱ्याने ४५.५ अंशांवर उसळी घेतली. आजही तापमान ४४.८ अंश होते. पुढील काही दिवस पारा आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रत्येकाने उन्हापासून स्वतःचा बचाव करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुख्यता त्वचा व डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्याचे सर्वात उष्ण नऊ दिवस म्हणजे नवतपा. नवतपाच्या नावाने विदर्भवासीयांना धडकीच भरते. साधारणपणे या दिवसांमध्ये सूर्यापासून येणारी ऊर्जा अधिक काळ पृथ्वीवर राहते. शिवाय सूर्य पृथ्वीच्या जवळ येतो. सूर्यकिरणे सरळ पृथ्वीवर पडत असल्याने उन्हाचे चटके अधिक जाणवतात. यामुळे कमाल तापमानात मोठी वाढ होते. नवतपामध्ये भारतातील जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवते. नवतपामध्ये पाऱ्याने अनेकवेळा विक्रमी उसळी घेतल्याचे वैदर्भीयांनी यापूर्वी अनुभवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून अवकाळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस कोसळत असल्याने उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. यंदा उन्हाळा जाणवलाच नाही, असे अनेक जण बोलत होते. परंतु रविवारपासून पाऱ्याने उसळी घेतली आणि उन्ह आणि उकाड्यामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. उष्णतेची लाट आठवडाभर कायम राहणार असल्याचे सांगितले जाते.

उन्हाची लाट तीव्र असल्याने शक्यतो बाहेर जाणे टाळले पाहिजे. अतिआवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. बाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे. शक्यतो सरबत, पन्हे यासोबतच पेय पदार्थ घ्यावेत. या दिवसांत मसालेदार पदार्थ टाळलेलेच बरे. सुती, सैल कपडे परिधान करावे. मळमळ, उलटी, ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच सवयी, राहणीमान, खानपान या गोष्टींकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

- डॉ. मिलिंद व्यवहारे

ही घ्या काळजी

  • सहसा हलका नाश्ता करूनच घराबाहेर पडा.

  • भर उन्हात दुपारी १२ ते ४ या वेळेत फिरणे टाळा.

  • सोबत पाण्याची बॉटल ठेवून अधूनमधून पाणी पित राहा.

  • दिवसभर अधूनमधून भरपूर पाणी प्यावे.

  • फळांचा रस, लिंबू पाणी, मठ्ठा, जीरा छाछ इत्यादीचे सेवन करा.

  • त्वचेच्या ॲलर्जीची समस्या असणाऱ्यांनी शरीरावर थेट ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी.

  • घाम शोषून घेणारे पांढरे सुती, सैल व नरम कपडे घालावे.

  • ऊन लागल्यास किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT