नागपूर : मुलांच्या आयुष्याला आकार देण्यात आई-वडिलांची मोठी भूमिका आहे. साहित्यिक, कवींनी तर आईचीच महती गायली आहे. त्या तुलनेत बापाला दुर्लक्षित ठेवले. मुलांना घडविण्यासाठी बाप मूकपणे कष्ट उपसत असतो. ते कष्ट उपसताना त्याला ना अहंकार असतो, ना दुःख, ना वेदना. बाप म्हणून काटेरी वाटेवरून चालत काम तो करीत असतो. हा एक बाप... आरोग्य विभागात शिपाई... आयुष्यभर सायकलचे पेडल मारत पाय झिजवताना मिळालेल्या अल्प वेतनातून मुलगा आणि मुलगी दोघांनाही इंजिनिअर बनवले. आज लेकरांच्या मनमंदिरातील देव असलेला हा बाप (fathers day) म्हणजे... सुरेश जरुळकर. (Suresh-Marulkar-made-the-lives-of-children-good)
छोटा ताजबाग परिसरातील भोसलेनगर येथे मुक्कामाला. नोकरीला ३० वर्षे पूर्ण झाली. निवृत्तीच्या वाटेवरील जरुळकर यांनी दोन्ही लेकरांना इंजिनिअर बनवले, हीच त्यांच्या आयुष्याची कमाई. सायकलच्या चाकावरून परिवाराच्या आयुष्याचा गाढा हाकलताना सुरुवातीला अवघे १,२०० रुपये मिळत होते. अल्प वेतनात भरला संसार चालवणं कठीण होतं. घरी कोणीच कमावतं नाही. घरची परिस्थिती बेताची. शिक्षण असूनही आयुष्यभर पदोन्नती मिळाली नाही, याचा गम नाही, मात्र मुलगा प्रलयला केमिकल इंजिनिअर बनवले. तर मुलगी धनश्रीला कॉम्पूटर इंजिनिअर!
पत्नी अन् लेकरांच्या पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी आयुष्याच्या वाटेवरील संकटांना सामोरे जाण्याची त्यांची धडपड आज फळाला आली. यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यालयात सुरेश जरुळकर यांची ‘शिपाई’ ही ओळख पुसली गेली. इंजिनिअर मुलांचा बाप अशी न्यारीच ओळख तयार झाली. त्यावेळी जरुळकर यांची छाती फुलून जाते.
कधीकाळी ‘रोटी, कपडा’साठी सुरू असलेल्या संघर्षावर मात करीत जरुळकर यांनी नुकतेच वर्षभरापूर्वी मुलीचे थाटात लग्न केले. मुलगी बंगळूर येथे असून ती नोकरीला आहे. तर मुलगा नागपुरात नोकरी करतो. लेकरांना शिकवणं अन् त्यांना पोटापुरत मिळावं हीच आशा उराशी बाळगून शून्यातून लेकरांचं विश्व उभं करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी केलेली तपस्या कामी आली.
लेकरांबाबत संवाद साधला असता लहानपणापासूनच मुलगा-मुलगी दोघेही हुशार. पहिल्या नंबरचा निकाल आला की, कष्ट उपसल्याचे दु:ख विरघळून जात होते. दहावी, बारावीनंतर इंजिनिअर झाल्यानंतर जग जिंकल्याचं समाधान मिळालं. पत्नी कोकिळाने लेकरांवर केलेले संस्कार मोलाचे ठरले, असे जरूळकर यांनी भारावलेल्या स्वरात सांगितले.
आमचे बाबा...
सर्व काही दिल्यानंतरही आजही सायकलवरून आयुष्य काढत असलेल्या आमच्या बाबाचा अभिमान आहे. एकच पोशाख घालून आम्हाला सात दिवसांच्या आठवड्यासाठी सात वेगवेगळे ड्रेस घेऊन देणारे आमचे बाबा कष्ट उचलत राहिले. स्वतःचं दु:ख पचवत आमच्या आयुष्याला आकार दिला. बाबा म्हणजे आधारस्तंभ आहेत. या भावना मुलगा प्रलय आणि मुलगी धनश्री यांनी व्यक्त केल्या.
(Suresh-Marulkar-made-the-lives-of-children-good)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.