Rope Way sakal
नागपूर

Devendra Fadnavis : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रोप वे

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात फ्रेंच कंपनी क्रोमा रोप-वे च्या माध्यमातून वन्यजीव पर्यटन कसे करता येईल या दृष्टीने अभ्यास करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात फ्रेंच कंपनी क्रोमा रोप-वे च्या माध्यमातून वन्यजीव पर्यटन कसे करता येईल या दृष्टीने अभ्यास करीत आहे. यातून शाश्वत वन्यजीव पर्यटन व्हावे हा उद्देश आहे. वनकायद्याचे पालन करूनच नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामुळे ताडोबात देश-विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होईल. चंद्रपूर जिल्हा जगाच्या नकाशावर जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विस्तारित बुटीबोरी एमआयडीसीतील दोन उद्योगांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भातील हिरवेगार आणि घनदाट जंगल, राज्यातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात असल्याने विदर्भाला पर्यटकांची पहिली पसंती आहे. यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पावर आता उद्योजकांची नजर आहे.

पर्यटनवाढीसाठी नवनवीन योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. पर्यटनवाढीसाठी इंडो फ्रान्स फोरमच्या उद्योजकांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर रोप-वे बांधण्याचा प्रस्ताव दिलेला होत. आता त्याला मूर्त रुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे झाल्यास ताडोबात देश-विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होणार आहे.

रोप वे पर्यटन सुरु करीत असताना वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. अभ्यास गटाच्या अहवालानंतर वन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबत करार करून शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी घडवलं सुसंस्कृतपणाचं दर्शन; चुलते श्रीनिवास पवार यांचे घेतले आशिर्वाद

Traffic Update: मतदारांची गावी जाऊन मतदान करण्यासाठी धडपड; मात्र वाहतूक कोंडीचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा

Chhatrapati Sambhajinagar Assembly Election : मतदार संख्येत भर; शाई वाढली, मतदान केंद्रांना तब्बल ७ हजार २०० बाटल्यांचा पुरवठा

Nashik Vidhan Sabha Election : बालेकिल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबीयांसमवेत प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

प्राजक्ता माळी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT