Sudhir Mungantiwr  
नागपूर

Teacher Recruitment: शिक्षक भरतीच्या लढ्यात वनमंत्र्यांची उडी! अभियोग्यताधारकाला थेट कॉल, शिक्षणमंत्र्यांसोबत विशेष बैठक

या ना त्या कारणाने रेंगाळलेल्या शिक्षक भरतीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Teachers Recruitment: या ना त्या कारणाने रेंगाळलेल्या शिक्षक भरतीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिक्षक भरतीच्या प्रश्नावर झटणाऱ्या अभियोग्यताधारकाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून राज्यातील विविध शासकीय व खासगी संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

राज्यात शिक्षकांच्या ७० हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यापैकी ८० टक्के पदभरतीला मान्यतासुद्धा मिळाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या दोन्ही परीक्षा घेऊन त्याचा निकाल लागला आहे. पण जवळपास १० महिन्यांचा कालावधी उलटला तरी जाहिरातीचा पत्ता नसल्याने अभियोग्यताधारक संदीप कांबळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक भरतीसंदर्भात रान पेटवले. राज्यभरातून प्रतिसादसुद्धा मिळाला. मध्यंतरी उमेदवारांनी हिवाळी अधिवेशनावर प्रत्येक जिल्हाधिकारी, शिक्षण आयुक्त कार्यालयावर उपोषणसुद्धा केले होते.

२०१७ च्या मागासवर्गीयांच्या ५० टक्के जागा कपात व शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रकाशित कराव्यात यासाठी शिक्षण आयुक्त, पुणे कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण ११ दिवस केले होते. शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळावी म्हणून कोरोना काळात संभाजीनगर ते मंत्रालय अस २२ दिवस लॉँगमार्च काढण्यात आला होता.(Latest Marathi News)

या सर्व आंदोलनाची दखल घेऊन संबधित अभियोग्यताधारक संदीप कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षकभरतीचा तिढा समजून घेतला. निश्चितच सरकारकडून विलंब होत असल्याचे मान्य करून शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात येवून तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले

राज्यात शिक्षकांच्या ७० हजारांवर रिक्त जागा असून त्यापैकी ८० टक्के पदभरतीला मान्यता मिळाली आहे. ही पदे भरण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनी ही पदे तात्काळ भरण्याबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी सुद्धा खाजगी संस्थेला व शिक्षणसम्राटांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला लगाम लावण्यासाठी पवित्र पोर्टल तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कार्यान्वित केले आहे.- संदीप कांबळे, अभियोग्यताधारक

काय झाले बोलणे...

जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका व खाजगी अनुदानित संस्था (इयत्ता ९ वी ते १२ वी) मधील शिक्षकांच्या रिक्त जागा आचारसंहितेपूर्वी एकाच टप्यात भरण्यात येतील. जास्तीत जास्त पदाची जाहिरात देण्यासाठी व राज्यातील पालकांना, शाळांना व बेरोजगार अभियोग्यताधारकांना न्याय मिळवून देणार. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव, आयुक्त यांच्यासोबत विशेष बैठकीचे आयोजन करून सविस्तर चर्चा करून पाठपुरावा करण्यात येईल.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT