नागपूर - मॉन्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असताना विदर्भात मात्र पारा दिवसेंदिवस चढत आहे. गुरुवारी प्रादेशिक हवामान विभागाचा यलो अलर्ट असूनही नागपूरच्या कमाल तापमानात दीड अंशांची वाढ होऊन पाऱ्याने ४२ पर्यंत उसळी घेतली. विदर्भातील अर्ध्याअधिक शहरांचा पारा आज चाळिशीवर गेला. शुक्रवार किंवा शनिवारी विदर्भात पावसाची शक्यता असल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.
पावसाचे पहिले नक्षत्र असलेला मृग उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच आता मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. मॉन्सूनच्या आगमनाला आणखी काही दिवस असून सूर्यदेवही विदर्भवासींची अजूनही परीक्षात घेत आहे. आज ब्रह्मपुरी (४३.०), गोंदिया (४२.२), नागपूर (४२.०), यवतमाळ (४२.०), भंडारा (४१.५), गडचिरोली (४१.०), चंद्रपूर (४१.०) आणि अकोला (४१.१) या शहरांमध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवले. नागपुरात दुपारच्या सुमारास ढगांची दाटी झाली होती, मात्र वरुणराजाने पुन्हा हुलकावणी दिली. मात्र बुधवारच्या तुलनेत आज उकाडा कमी जाणवला.
दरम्यान, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, कारंजा व अकोल्यासह नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मॉन्सूनपूर्व पाऊस बरसल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार मॉन्सूनपूर्व सरींची दाट शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.