perfume godown fire in itwari sakal
नागपूर

Godown Fire : अत्तराच्या गोदामाला भीषण आग! १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी, मुलगा थोडक्यात बचावला

अत्तराच्या गोदामाला भीषण आग लागून एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर तिचे आई-वडील गंभीर जखमी आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - अत्तराच्या गोदामाला भीषण आग लागून एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर तिचे आई-वडील गंभीर जखमी आहेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून मुलगा मात्र थोडक्यात बचावला. ही घटना खापरीपुरा, इतवारी येथे बुधवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास घडली.

अनुष्का बाकडे (वय,१७) असे मृत मुलीचे नाव असून प्रवीण बाकडे (वय, ४०) आणि त्यांची पत्नी प्रीती बाकडे (वय, ३७) गंभीर जखमी आहेत. तर मुलगा रौनक (वय, १५) थोडक्यात बचावला.

इतवारीतील खापरीपुरा परिसरात प्रवीण बाकडे यांचे रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. दुकानाच्यावर पहिल्या माळ्यावर ते कुटुंबासह राहतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी तळमजल्यावरील गोदाम विकले होते. बुधवारी पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण करीत संपूर्ण इमारतीला वेढले.

यावेळी कुटुंबातील एक सदस्य जागा झाला. आग पाहून त्यांनी बचावासाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले. त्यानंतर तातडीने ही माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी नऊ गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले.

गोडाऊनमध्ये अत्तर तसेच प्लास्टिकच्या वस्तू असल्याने आग विझविण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोठी अडचण झाली. आत अडकलेल्या चार जणांना बाहेर काढण्यात आले. गोडाऊनमधील साहित्य पूर्णपणे जळून राख झाले.

रासायनिक द्रव्यामुळे पसरली आग

बाकडे यांच्या तळमजल्यात असलेल्या गोडाऊनमध्ये सौंदर्यवर्धक वस्तू होत्या. यात अत्तर, प्लास्टिकच्या वस्तू विविध प्रकारचे परफ्यूम यामुळे आग पसरण्यास वेळ लागला नाही. गोडाऊनच्यावर पहिल्या माळ्यावर बाटाचे गोडाऊन सुद्धा आहेत. येथे विविध प्रकारच्या चप्पल आणि जोडे होते. तर त्यावर बाकडे कुटुंब दुसऱ्या माळ्यावर राहत होते. आगीमुळे धूर पसरून श्वास गुदमरल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर बाकडे दांपत्य होरपळून गंभीर झाले.

अनुष्काने स्वतःला कोंडले पण ...

आग लागली तेव्हा घाबरून मुलगा रौनक छतावर पळाला तर अनुष्काने शौचालयात जाऊन स्वतःला कोंडून घेतले. आई-वडील घाबरत बाहेर निघाले तेव्हा अनुष्का आणि रौनकचा पत्ता लागलेला नव्हता. पळापळीने कुणालाच सूचले नाही. दार तोडून अनुष्काचा शोध घेतला असता ती शौचालयात आढळली. तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

३० जवानांचे शर्थीचे प्रयत्न

अतिशय दाटीवाटीचा हा परिसर असल्याने अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यात आणि इमारतीतील आग विझविण्यास मोठी अडचण झाली. पहाटे ५.२० ला लागलेली आग दुपारी १ वाजेपर्यंत पूर्णपणे आटोक्यात आली. यात सक्करदरा, लकडगंज, कॉटन मार्केट, सिव्हिल लाइन्स, सुगतनगर आणि कळमना भागातील मनपाच्या अग्निशमन केंद्रातून ९ गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या. जवळपास ३० जवानांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यास यश आल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT