नागपूर : दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या देशातील ‘टॉप १०’ शहरामध्ये नागपूर शहराचा समावेश असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने (इंटलिजन्स ब्युरो) दिला होता. हा इशारा लक्षात घेता पोलिस विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे शहरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्या दृष्टीने शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून शहरातील ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात इशारा लक्षात घेता बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यामुळे शनिवारपासूनच संवेदनशील भागांसह उपराजधानीला सशस्त्र पोलिसांचा वेढा घालण्यात आला. शहरात दोन हजारांपेक्षा अधिक सशस्त्र पोलिस तैनात केले आहेत.
शहराच्या नाक्यांवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हॉटेल व लॉजची झाडाझडती घेणे सुरू आहे. गर्दीची ठिकाणे विशेषत: फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, बाजारपेठेतील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी साध्या गणवेशातील पोलिस तैनात आहेत. सिव्हिल लाइन्स, सदर,अंबाझरी, टेकडी रोड, सीताबर्डी, मोमीनपुरा, फुटाळा तलाव आदी भागात सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले. संघ मुख्यालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणांवरही पोलिसांचे विशेष लक्ष आहे.
शीघ्र कृती पथक व दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय गुन्हेशाखा व विशेष शाखेतील पोलिसही सतर्क आहेत. ठिकठिकाणी फिक्स पॉईन्ट लावण्यात आले असून नाकाबंदी करण्यात येत आहे. फुटाळा तलाव परिसरात स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून गस्त घालण्यास सुरुवात केली. स्टंटबाजांवरही पोलिसांचा विशेष ‘वॉच’ असणार आहे.
शहरात येणाऱ्या सर्वच सीमेवर कडेकोट बंदोबस्त केला असून वाहनांची तपासणी सुरू आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन आहे.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.