नागपूर

८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

नरेंद्र चोरे

नागपूर : एखाद्या व्यक्तीमध्ये प्रबळ इच्छाशक्ती व संयम असेल आणि त्याला प्रभावी उपचाराची जोड असेल तर तो व्यक्ती कोणत्याही गंभीर आजारावर सहज मात करू शकतो. ८० वर्षीय रत्नाकर राऊत यांच्यासह परिवाराने कोरोनाला हरवून ही बाब सिद्ध करून दाखविली. (The-80-year-old-senior-beat-Corona-virus)

महाराष्ट्र फेस्कॉम या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेचे पूर्व विदर्भ सचिव असलेले राऊत यांनी गतवर्षी लॉकडाउन लागल्यापासून लसीकरणाचा अपवाद वगळता घराचा उंबरठादेखील ओलांडला नाही. मात्र, काळजी घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली. दहा एप्रिल रोजी ताप, हातपाय दुखणे, खोकला व उलटीसारखी लक्षणे जाणवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोरोनाची चाचणी केली, ज्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून घरातील इतरही सदस्यांची चाचणी करवून घेतली. त्यात मुलगा हर्षवर्धन आणि सून प्राजक्ता यांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले, तर १३ वर्षांचा नातू अभिमोद निगेटिव्ह आला. त्यामुळे तिघेही ‘होम क्वारंटाइन’ होऊन उपचार सुरू केले.

उपचार सुरू असतानाच अचानक एकेदिवशी मुलाची तब्येत बिघडली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने आयसीयूत शिफ्ट करावे लागले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून हर्षवर्धनला संकटातून बाहेर काढले. घरी उपचार घेणारे राऊत व त्यांची सूनही कोरोनामुक्त झाले.

कोरोनामुळे २९ ऑगस्टला पत्नी मरण पावल्यानंतरही आम्ही घाबरलो नाही. पॉझिटिव्ह राहून आजाराचा धैर्याने सामना केला. मनात भीती न बाळगता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित उपचार, संतुलित आहार व दररोज व्यायाम व प्राणायाम केल्यास कोरोनाला सहज मात करता येऊ शकते, असे राऊत यांनी सांगितले.

कोरोना आल्यापासून कधीही घराबाहेर पडलो नाही. सरकारच्या गाईडलाइन्सचे काटेकोरपणे पालन केले. त्याउपरही कोरोनाची लागण झाली. पण एका क्षणासाठीही घाबरलो नाही. योग्य उपचार केल्यास कोरोनाला हरवू शकतो, असा मला विश्वास होता. कोरोनामुक्त झाल्याचा आनंद व समाधान आहे.
- रत्नाकर राऊत, ज्येष्ठ नागरिक

(The-80-year-old-senior-beat-Corona-virus)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT