Crime News sakal
नागपूर

Crime News : पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट ; चौघांना अटक,बेवारस मृतदेह सापडल्याचा उलगडा

नांदगावपेठ ते कठोरा गांधी मार्गावर रस्त्याच्या कडेला २१ एप्रिल २०२४ रोजी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची बाब पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : नांदगावपेठ ते कठोरा गांधी मार्गावर रस्त्याच्या कडेला २१ एप्रिल २०२४ रोजी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची बाब पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिलिंद सौदागर वाघ (वय ४२, अनंत विहार कॉलनी, अमरावती), असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते माजी सैनिक होते, अशी माहिती नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक हनमंत डोपेवाड यांनी दिली. पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३) मृत व्यक्तीच्या पत्नीसह कटात सहभागी एकूण चौघांविरुद्ध हत्या व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शुभम देविदास भोयर (वय २९), संकेत अशोक बोळे (वय २९), कार्तिक मुरलीधर कडूकर (वय १९) व मृतकाची पत्नी, अशी हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या चौघा संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत माजी सैनिकाचे लहान भाऊ प्रशांत सौदागर वाघ (वय ३७, रा. तापडियानगर, अकोला) यांनी सदर प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. २१ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कठोरा गांधी मार्गावर राठी यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला मिलिंद सौदागर वाघ यांचा कुजलेला मृतदेह आढळला होता. ते १९ एप्रिल २०२४ रोजी रात्री नऊ वाजेपासून बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी नांदगावपेठ ठाण्यात नोंदविली होती.

त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व नऊ वर्षांची मुलगी, अशा दोघी मायलेकी राहत होत्या. श्री. वाघ सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना मिळालेल्या पैशाचे सोने विकत घेतले होते. त्यानंतर त्यांचा पत्नीशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला. पत्नी सोने घेऊन माहेरी निघून गेली, असा आरोप मृत व्यक्तीचे भाऊ प्रशांत वाघ यांनी तक्रारीत केला आहे.

त्यानंतर मिलिंद वाघ यांनी बँकेचे कर्ज असल्याने ते फेडण्याकरिता घर विकायला काढले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पत्नी ही पुन्हा पतीकडे परत राहायला आली.त्यानंतरही पती-पत्नीत वाद होत असल्याने मिलिंद वाघ यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: भाऊ आणि मुलगा यांमध्ये श्रीनिवास पवारांची भूमिका काय?

Assembly Elections Voting Percentage: सर्वाधिक गडचिरोलीमध्ये तर सर्वात कमी नांदेडमध्ये; सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात एकूण किती टक्के मतदान?

IND vs AUS: भारतीय संघात ऐनवेळी बदल, युवा फलंदाजाचा तातडीने केला समावेश; BCCI ने का घेतला असा निर्णय?

ST Bus Service : निवडणुकीचा एसटी सेवेला फटका! लालपरीच्या तब्बल ८८४ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

IPO Rule: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; पुढील महिन्यापासून बदलणार IPOचे नियम?

SCROLL FOR NEXT