file image canva
नागपूर

'आई ऽऽऽ'च्या हंबरड्यानं गहिवरले ग्रामस्थ, जगात येण्यापूर्वीच हरवलं बापाचं छत्र

एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, अख्खं गाव हळहळलं

सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील टेकाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून गावात एकाच दिवशी तिघांचा बळी गेल्याने गाव हादरून सुटले आहे. एकाच दिवशी मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवल्याने 'आई ऽऽऽ....या हंबरड्याने ग्रामस्थ गहिवरले, तर ३१ वर्षीय युवकाच्या जाण्याने पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीपुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारं गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी अनुभवले आहे.

शासनाने अनेक निर्बध लावून कोरोनाची परिस्थितीत प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे संकेत देत स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन केले आहे. अशात आठ दहा दिवस अंगावर रोग काढून रुग्णालय गाठणे आता नागरिकांच्या अंगलट येताना दिसून येत आहे. गावात दिवसागणिक मृत्यूचे तांडव सुरूच आहे. अशात काही दिवस मृतांच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. मंगळवारचा दिवस गावासाठी वाईट बातमी घेऊन उगवला. रात्रीला रुग्णालयात भरती केलेली आई सकाळी परतलीच नसल्याने गावात दिवस निघताच 'आईऽऽऽ...असा हंबरडा ग्रामस्थांच्या कानी पडला आणि गावात सकाळच्या चुली पेटल्याच नाही.

हेही वाचा - भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित

जवाहरलाल रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन अपघातात मृत कल्पना अनिल कडू (वय४०), किरण राधेश्याम बोराडे (वय४५) या दोघीही गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या. किरण बोराडे यांची कोविड चाचणी बाधित आली होती. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्पना कडू यांची देखील गेल्या आठ दिवसापासून प्रकृती खालावलेली होती. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांना जे. एन.रुग्णालयात सोमवारीच दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी मंगळवारी घेण्यात येणार होती. परंतु, त्या आधीच पर्याप्त ऑक्सिजन मिळाले नसल्याने दोघीही दगावल्याचे वृत्त गावात धडकले. या दोघांच्या मृत्यूची बातमी नंतर लगेच गावातील हरहुन्नरी ३१ वर्षीय युवक सुहास रामकृष्ण मोहूर्ले हा काही दिवसाआधी कोरोना बाधित आला होता. नागपूर स्थित खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारला त्याच्या मृत्यूच्या बातमीने गावात स्मशान शांतताच निर्माण झाली. सुहास याचे वडील देखील नागपूर स्थित खासगी रुग्णालयात कोरोनाशी दोन दोन हात करीत आहेत, तर घरी सुहासची ५ महिन्याची गर्भवती पत्नी पती जाण्याची कुठलीच चाहूल न लागता त्याच्या सुदृढ आयुष्याची प्रार्थना करत बाळासोबत आयुष्यचे स्वप्न रंगवत होती. नातेवाईकांनी हिमतीने तिला घाटावर नेऊन दुःखद बातमी दिली. त्यानंतर तिच्या पुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारे गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी पाहिलं आहे. बऱ्याच घरी चुलीही पेटल्याच नाहीत.

हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना रुग्णांचा जीव

रुग्ण दाखल झाले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती. नागपूरला उपचारासाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्राथमिकता जवाहरला नेहरू रुग्णालयाला दिली होती. पूर्ण रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल अगोदरच कमी होते. प्रत्येकाला व्हेंटिलेटरची गरज होती. नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर व बेडस वारंवार संपर्क करून देखील उपलब्ध होत नव्हते. त्याची ताकीद देखील नातेवाइकांना आधीच देण्यात आली होती.
-डॉ.गजानन धुर्वे, कोविड केंद्राचे निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT