उमरेड (जि. नागपूर) ः उमरेड-पवनी- कऱ्हाडला अभयारण्यातील उमरेड वन्यजीव क्षेत्रात शुक्रवारी (ता.१) एका वाघिणीसह दोन बछड्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आज क्षेत्रतपासणी दरम्यान, तिसऱ्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पांढऱ्या रंगाची कालवड अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळल्याने मृत कालवडीवर विषबाधा केल्याचे उघड झाले.
मृत वाघांच्या शरीराचे महत्त्वाचे सर्वच अवयव शाबूत असल्याचे दिसून आले. अटक करण्यात आलेल्या दिवाकर दत्तुजी नागोकर (नवेगाव साधू ) याला न्यायालयाने वन कोठडी दिली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार गठीत समितीने घटनास्थळी आज दाखल झाले. त्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सहाय्यक वन महानिरीक्षक हेमंत कामडी, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून रोहित कारू, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पतोडे यांचा समावेश होता. समिती सदस्याद्वारे घटना स्थळाची पाहणी केली.
दरम्यान, वाघीणीच्या तिसऱ्या बछड्या मृतदेह क्षेत्रतपासणी दरम्यान आढळून आला. मृत वाघांचे शरीराचे महत्त्वाचे सर्व अवयव शाबूत होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार मृत वाघीण व तिन बछड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर संकलीत केलेले नमूने आणि घटनास्थळी मृतावस्थेत आढळलेल्या कालवडीच्या कातडीचे नमुनेसुद्धा उत्तरीय तपासणी व पुढील तपासणीसाठी न्याय सहाय्यक प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे.
वाघीण अंदाजे चार वर्षाची असून मृत बछड्यांचे वय अंदाचे पाच महिन्याचे आहे. मृत वाघीण ही उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यामधील असून २०१३-१४ मध्ये फेज फोरमध्ये संनियत्रणानुसार या वाघीणीस भारतीय वन्यजीव संस्थेद्वारे टी ४ या नावाने ओळखले जात होते. नागोकर याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याची वनकोठडीत रवानगी केली आहे. सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजीत साजणे हे तपास करीत आहे. घटनास्थळाला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी भेट दिली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.