नागपूर

आया ये शेरों का ‘झुंड’ है; महानायक पुन्हा मैदानावर

प्रमोद काळबांडे

नागपूर : कांजीहाउस चौकाजवळील बंदानवाझनगर परिसर. तेथील एनआयटी ग्राउंड. चिअर्स करणारी लहानमोठी दोनशेक मुले-मुली. फुटबॉलची रोमांचक मॅच (Exciting football match) आटोपलेली. विजयी टीमला उत्साहात पुरस्कार वितरण झाले आणि विजय बारसेंनी (Vijay Barse) माइक हाती घेतला. ‘‘का रे ऽऽ खर्रा कोण कोण खाता? हात वर करा.’’ चार-दोन तरुणांनी लागलीच हात वर केले. त्यांना पाहून लाजत लाजत मग आणखी काही हात उंचावले गेले. ‘‘चला यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करूया.’’ बारसे सरांच्या सूचनेनंतर मैदान कडकडाटांनी शहारून गेले. (Transformation-of-slum-youth-from-football)

मैदानाच्या एका दिशेला मुस्लिम वस्ती. दुसऱ्या दिशेला छत्तीसगडी. तर तिसरीकडे ख्रिश्चन. बहुसंख्य भागात झोपडपट्टी. या मैदानावर रविवारी फुटबॉलचा सामना रंगला. काही उंचपुरे, काही हडकुळे, पण धावण्यात कमालीची गती असणारे, आत्मविश्वासाने ओथंबलेले तरुण तासभर भान हरवून खेळत होते. ‘काले को पिले को, साबुन से धोने को, आया ये शेरों का झुंड है.’ लाउडस्पीकरवर ‘झुंड’ सिनेमाच्या ट्रेलरमधील गाणे वाजत होते. स्पर्धेचे नावही ‘झुंड झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा.’

स्पर्धेच्या नावाप्रमाणेच या टीममधील बहुसंख्य फुटबॉलपटू झोपडपट्टीत राहणारे. त्यांच्यापुढे विजय बारसे व्यसनावर बोलले. ‘‘मीही तुमच्यासारखाच झोपडीतच राहणारा होतो. पण, पुढे जाताना मला जे हवे होते तेवढेच माझ्याजवळ ठेवले. तुम्ही व्यसनांना पुढे घेऊन निघालात, तर तुमचा भविष्यातील सोबती व्यसनच असेल. उज्ज्वल भविष्य तुमची वाट बघत आहे. व्यसनाला सोबत न्यायचे की फुटबॉलला? बोला!’’ तरुण ताडकन उत्तरले, ‘‘फुटबॉलला सर.’’

मैदानावर सोळा टीममध्ये सामने झाले. पंधराएक दिवसांपासून त्यासाठी शेकडो तरुण विविध मैदांवर सराव करीत होते. नागपुरातील झोपडपट्टी म्हणजे मुक्तपणे व्यसन करण्याची मिळालेली जणू परवानगी. वाढती बेरोजगारी, त्यामुळे गुन्हेगारीही वाढलेली. नागपुरात साडेचारशेहून जास्त अधिकृत झोपडपट्टी वसाहती. अनधिकृतची संख्याही तेवढीच. शहराची एकतृतीयांश लोकसंख्या या झोपडपट्टीमध्ये राहते. या अफाट आणि अनियंत्रित लोकसंख्येपैकी ऐन वयात येणाऱ्या तरुणांमध्ये आत्मभान पेरण्याचे काम गेल्या २० वर्षांपासून प्रा. विजय बारसे करीत आहेत.

लॉकडाउनच्या अडथळ्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांच्या ‘क्रीडा विकास संस्थे’च्या वतीने झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धांना सुरुवात केली. बारसे सरांच्या जीवनसंघर्षावर नागराज मंजुळे यांनी ‘झुंड’ सिनेमा काढला. याच नावाने या यावेळी स्पर्धेचे नामकरण केले गेले. शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांत फुटबॉलचे सामने रंगणार आहेत. जवळपास १६० टीम म्हणजे सोळाशेहून जास्त खेळाडू प्रत्यक्ष खेळतील. परंतु, त्यांच्यासोबत झोपडपट्टीतील हजारो तरुण-तरुणी सहभागी होतील. तरुणांच्या परिवर्तनाचा हा सोहळा पाहण्यासाठी मैदान गाठावे लागेल.

‘फुटबॉलमधून परिवर्तन’ हे त्यांचे या खेळामागील ब्रीद

प्रा. बारसे यांनी नागपूर शहरातून २००१ मध्ये सुरू केलेल्या झोपडपट्टी फुलबॉलचा विस्तार ‘स्लम सॉकर’ म्हणून जगभर झाला आहे. १६० देशांमध्ये स्पर्धा भरविल्या जातात. त्यात भारतातील झोपडपट्टीतील खेळाडूंनाही संधी मिळते. ‘फुटबॉलमधून परिवर्तन’ हे त्यांचे या खेळामागील ब्रीद आहे. ‘झुंड’ सिनेमात साक्षात अमिताभ बच्चन यांनी त्यांची भूमिका साकारली आहे.

(Transformation-of-slum-youth-from-football)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT