नागपूर : राज्यात दीड महिन्यापासून लावण्यात आलेल्या टाळेबंदी (Corona Lockdown) आणि निर्बंधामुळे वाहतुकीवर ८० टक्के परिणाम झाला आहे. परराज्यात नेण्यासाठी किंवा तेथून आणण्यासाठी मालाची (Transportation Business) उपलब्धता नाही. परिणामी एकूण मालमोटारीच्या ८० टक्के गाड्या एकाच ठिकाणी उभ्या आहेत. दरम्यान, डिझेलचे वाढलेले दर (Hike in Diesel) आणि बॅंकेच्या मासिक हप्ते भरण्यासाठी होत असलेला पाठपुरावा यामुळे वाहतूकदार मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळेच मालमोटारीचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दीड महिन्यापासून माल वाहतूक बंद असल्याने अंदाजे ६ ते सात हजार कोटीचा माल वाहतुकीचा व्यवसाय बुडाला आहे. (transportation business workers are in trouble due to corona lockdown)
गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून नोव्हेबर ते जानेवारी या दोन ते तीन महिन्यातच पूर्ण अथवा सुमार क्षमतेने वाहतूक झाली.एक गाडीची किंमत अंदाजे ४० ते ४५ लाख रुपये असते. त्यावर एक ते सव्वा लाख रुपयाचा मासिक हप्ता भरावा लागतो. दीड महिन्यापासून वाहतूक बंद असल्याने तो आता कसा भरायचा याचा आता आर्थिक ताण खूप अधिक आहे, असे नागपूर ट्रकर्स युनियनचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाहतूक व्यवसायात दररोज २०० ते २२५ कोटी उलाढाल होते. देशाच्या मध्यवर्ती भागात नागपूर असल्याने देशभरातून येथे माल येते व येथून इतर राज्यात पाठविण्यात येतो. त्यामुळे शहरात २५ हजारच्या आसपास ट्रक अथवा इतर मालवाहतुकीच्या गाड्या आहेत. दुसऱ्या लाटेत केवळ दोन-अडीच हजार मोटारीच रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे पुढील एका वर्षासाठी कर्जहप्ते पुढे ढकलण्यात यावे आणि व्याज माफ करावे. याशिवाय वाहनावरील कर आणि विमा हफ्त्याचे शुल्क रद्द करावे अशी मागणीही मारवाह यांनी केली आहे.
वाहनचालकांनाही मोठ्या अडचणी जाणवत असून कोरोना काळात परराज्यात अडकून पडलेल्या मालमोटारीचेही मोठे प्रश्न असल्याचे सांगण्यात येते. परराज्यातून रिकामी मालमोटार आणणे म्हणजे स्वत:हून नुकसान करून घेणे आहे. पण आता कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली येथे कोरोना कहर असल्याने तेथूनही माल मिळणे अवघड होत आहे. त्याचा मालमोटार वाहतुकीच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे.
मालमोटर वाहतूक क्षेत्रात अंदाजे १० ते १२ हजार कामगार आहेत. त्यांनाही काम मिळत नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना असोसिएशन अथवा मालकांकडून आर्थिक सहकार्य केले जात असले तरी ते अपुरे आहे. सध्या पगार देण्यासाठी पैसा नसल्याचेही ओल इंडिया नागपूर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आर.के. वर्मा यांनी सांगितले.
(transportation business workers are in trouble due to corona lockdown)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.