Two vehicles collided with third while taking a U-turn on Wardha Road 1 killed 1 injured politics  sakal
नागपूर

Nagpur Accident : वर्धा मार्गावर दोन वाहने यू-टर्न घेताना तिसऱ्याची धडक; १ ठार,१ जखमी

वर्धा मार्गावरील जामठा टी पॉईंटवर रविवारी (ता.२९) पहाटे ४ च्या सुमारास नागपूरकडे येणाऱ्या मिक्सर ट्रकने कंटेनरला धडक दिली

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा : वर्धा मार्गावरील जामठा टी पॉईंटवर रविवारी (ता.२९) पहाटे ४ च्या सुमारास नागपूरकडे येणाऱ्या मिक्सर ट्रकने कंटेनरला धडक दिली व त्यानंतर विरुद्ध बाजूला असलेल्या कारवर कंटेनर आदळला. या विचित्र अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रामलाल गोपिलाल चव्हाण (वय ५७, गूढा, भिलवाडा राजस्थान) असे मृताचे नाव आहे. तो या दोन ट्रकपैकी एकाचा चालक असावा, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील फिर्यादी कारचालक स्वप्नील हुलके (मानेवाडा, नागपूर) हे कारने (एमएच ४९,सीडी ९४१२) जामठा चौकात आले. त्यांना वर्धा लेनवरून नागपूरकडे येणाऱ्या लेनवर जाण्यासाठी ‘युटर्न’ घ्यायचा असल्याने थांबले.

त्याच वेळी एक कंटेनरसुद्धा (केए-४१, डी-४४१५) नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर चौकात आला व त्यालाही चौकातून ‘युटर्न’ मारून वर्धेकडे जाणाऱ्या लेनवर जायचे असल्याने तोही चौकात आला. नागपूरकडे येणाऱ्या लेनवरून कंटेनरच्या पाठीमागून एक मिक्सर वाहन (टीएस-२२, टी ९४२३)भरधाव आले. दरम्यान त्याच्या चालकाने कंटेनरला जोरात धडक दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT