नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यात शिवसेना आक्रमक झाली होती. त्यानंतर आता परत राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. याबाबतच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (minister uday samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना मंत्री उदय सामंत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेबद्दल विचारले असता ते म्हणाले, ''यात्रेदरम्यान जशी अॅक्शन येईल तशी रिअॅक्शन शिवसेनेकडून जाईल. खरं म्हणजे केंद्रातील चार मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा राज्यात सुरू आहे. पण, फक्त कोकणातील जनआशीर्वाद यात्रा गाजत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्यासाठी देवासारखे आहेत. त्यामुळे त्यांबाबत कोणीही वाईट बोलले तर आम्ही खपवून घेणार नाही.''
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड १५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याबाबत उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी अशी भेट होत असेल तर महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा भेटी होणे यात काही गैर नाही, असे सामंत म्हणाले. या भेटीनंतर युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, याकडे लक्ष वेधले असता पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय शिवसैनिक म्हणून आमच्यासाठी बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, नारायण राणे यांच्या घरासमोर लाठ्या खाणाऱ्या शिवसैनिकाला युवासेनेत पद देण्यात आले. त्याबाबत बोलताना सामंत म्हणाले, ''मुंबईत नारायण राणेंच्या घरासमोर झालेला युवासेना पदाधिकाऱ्यांचा राडा हा भावनेचा उद्रेक होता. त्यामुळे गुंडाला बढती दिली असा काही प्रकार नाही.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.