Uddhav Thackeray-Devendra Fadnavis google
नागपूर

Uddhav Thackeray: "फडणवीस नागपूरला कलंक आहेत"; उद्धव ठाकरेंची नागपूरमध्ये कडाडून टीका

नागपूरच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत ठाकरेंनी भाजपसह अजितदादांवरही निशाणा साधला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. नागपूरमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना भाजपवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray harshly criticized on Devendra Fadnavis in Nagpur rally)

ठाकरे म्हणाले, "कालपरवा पर्यंत आपल्यासोबत जे होते ते आता पलिकडं गेले आहेत. त्यांना अचानक साक्षात्कार झाला. जो काही विकास घडतोय तो त्यांच्याचमुळं घडतोय. कालपर्यंत एकमेकांना शिव्या देत होते, आता अचानक विकास पुरुष झालेत. हा त्यांचा स्वतःचा विकास होतोय. अंबादास दानवेंनी मला सांगितंल की, नागपुरमध्ये गावठी कट्टा गहाण टाकून पैसे दिले जातात. माझ्या शेतकऱ्याला जर कर्ज पाहिजे असेल तर त्याला आपलं जमीन, घर आणि पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं. पण इथं गावठी कट्ट्यावर पैसे देणारी अवलाद इथं नागपूरमध्ये गृहमंत्र्यांच्या गावात आहे" (Latest Marathi News)

फडणवीसांची हालत सध्या अशी विचित्र झालेली आहे की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असा उल्लेख करताना ठाकरेंनी फडणवीसांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही, असं ते म्हणाले होते. यावर "अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा" अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर कडाडून टीका केली. (Marathi Tajya Batmya)

२०१४ साली युती शिवसेनेनं नव्हती तोडली. यावेळी असं काय घडलं होतं की तुम्ही आमच्याशी युती तोडली? असा सवालही त्यांनी विचारला. त्यावेळी एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि सांगितलं गेलं की तुमच्यासोबत जायला नको असं भाजपचे लोक म्हणत आहेत. म्हणजेच युती तुम्ही तोडली, वार करणारे आम्ही नाही तुम्ही आहात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT