Uddhav Thackeray sakal
नागपूर

Uddhav Thackeray Nagpur Visit : नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे समर्थकांचा राडा; घोषणाबाजीने दणाणला परिसर

राज्याच्या राजकारणात कायम एकमेकांना लक्ष्य करणारे शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे व भाजपचे नेते, आमदार नीतेश राणे रविवारी नागपुरात आले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याच्या राजकारणात कायम एकमेकांना लक्ष्य करणारे शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे व भाजपचे नेते, आमदार नीतेश राणे रविवारी नागपुरात आले. दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने विमानतळ परिसर दणाणून गेला.

काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत राणे यांची रवानगी दुसऱ्या द्वारातून केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आदित्य ठाकरे यांची वाट अडवण्याचा जो प्रकार घडला होता, त्याचा हिशेब नागपुरात चुकता झालाय का? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

विमानतळावर सकाळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव वाढला होता. गोंधळात पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु, पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे नागपूर विमानतळावर तणावपूर्ण शांतता पसरली.

विमानतळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी भाजप नेते नीतेश राणे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. नीतेश राणे हे परतवाडा येथे हिंदू आक्रोश सभेला जाण्यासाठी नागपूर विमानतळवार उतरले. त्याचवेळी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर होते.

शिवसैनिकांना जेव्हा कळले की, नीतेश राणे दुसऱ्या द्वाराने बाहेर पडत आहे. तेव्हा शिवसैनिक आगमन गेटवर गेले आणि त्यांनी नीतेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शिवसैनिकांना परत प्रस्थान गेटवर पाठवले. त्यानंतर नीतेश राणे यांना रास्ता मोकळा करून देत पोलिसांनी परतवाडाकडे रवाना केले.

मतभेद दूर ठेवून कामाला लागा; उद्धव ठाकरे

शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीत पूर्व विदर्भात १४ जागांची मागणी केली आहे. रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर पक्षाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख व उपनेते आमदार भास्कर जाधव यांनी या जागांचा आढावा ठेवला. त्यानंतर इच्छुंकाशी संवाद साधत असताना ठाकरेंसमोरच काहींनी आपले दावे भक्कम करीत दुसऱ्यांवर आरोप केले. त्यामुळे काहीसे नाराज होत ठाकरेंनी एकोपा ठेवा, मतभेद बाजूला सारा असे आवाहन केले.

कळमेश्वर येथील कार्यक्रमासाठी ठाकरे नागपुरात आले असता त्यांनी हॉटेल रेडिसन ब्लू येथे पूर्व विदर्भातील जागांबाबत आढावा घेतला. संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, पूर्व विदर्भात नागपूर शहरातील दक्षिण, पूर्व, जिल्ह्यातील रामटेक, हिंगणा, कामठी, भंडारा, तुमसर, गोंदिया, आरमोरी, चंद्रपूर, वणी-वरोरा या जागांचीही मागणी करण्यात आली.

मविआत शिवसैनिकांची मोठी भूमिका असून, सरकार उलथवून टाकण्यासाठी अधिक सजगपणे लढावे लागेल, असे मत व्यक्त केली. दक्षिण नागपूरातून जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, दीपक कापसे दावे केले तसेच पूर्व नागपूरातून गुड्डू रहांगडाले, प्रवीण बरडे, हरिभाऊ बानाईत यांनी उमेदवारी मागितली. गोंदियात माजी आमदार रमेश कुथे, पंकज यादव, रामटेकमध्ये माजी खासदार प्रकाश जाधव, विशाल बरबटे यांनी उमेदवारीची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT