Nagpur Sakal
नागपूर

Nagpur : कोच्छी जलप्रकल्प कधी होणार पूर्ण? २३२ कोटींचा खर्च झाला चौपट, पुनर्वसनाची कामे कासवगतीने

कोच्छी बॅरेज जल प्रकल्पाला १९९४ ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रशासकीय मंजुरी दिली.

अशोक डाहाके

केळवद : सावनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणाऱ्या कोच्छी बॅरेज जल प्रकल्पाचे गेल्या तीस वर्षांपासून सुरू असलेले काम अजूनही संपलेले नाही. या प्रकल्पाचा मुळ खर्च २३२ कोटी होता. तो आता दीड हजार कोटींवर गेला आहे. पुनर्वसनाची कामे संथगतीने सुरू असल्याने हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कोच्छी प्रकल्पाच्या कामाचा वेग फारच कमी आहे. नागपूर जिल्ह्यातील सिंचनक्षमता दिवसेंदिवस घटत असताना अपूर्ण सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची गरज असताना शासनाकडून वेळेवर आणि पुरेसा निधी न मिळणे, पुनर्वसनाची कामे रेंगाळणे, भूसंपादन प्रक्रिया आदी अडथळ्यांचा परिणाम प्रकल्पाच्या कामावर झाला आहे.

कोच्छी बॅरेज जल प्रकल्पाला १९९४ ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रशासकीय मंजुरी दिली. माजीमंत्री आणि विद्यमान आमदार सुनील केदार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे २००६ मध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. जे हाल गोसेखूर्दचे झाले तेच हाल कोच्छीचे होत आहेत. जवळपास तीस वर्षांचा काळ लोटला तरी शेतकऱ्यांच्या शेतात ना पाट गेले ना पाणी!

२००६-०७ मध्ये प्रकल्पासाठी राज्य सरकारने २६२ कोटी मंजूर केले होते. त्यानंतर एवढा काळ झाला की आता प्रकल्पाचे पूर्ण काम होण्यासाठी जवळपास १५७० कोटी खर्च अपेक्षीत आहे.

कोच्छी गावाच्या पुनर्वसनाचे काम पूर्णत्वाकडे

कोच्छी प्रकल्पामुळे कोच्छी, रायवाडी, खैरीढालगाव ही गावे बुडीत क्षेत्रात आहेत. यापैकी कोच्छीच्या पुनर्वसनाचे काम प्रगतिपथावर आहे. रायवाडी येथील गावकऱ्यांना जागेचे पट्टे वाटप झालेले नाहीत. खैरीढालगाव या गावाच्या पुनर्वसनाचे काम कासवगतीने सुरु आहे. या गावातील शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला दिला असून घरांचा मोबदला देणे बाकी आहे.पिपळा, टेंबुरडोह, चौराखैरी, ढकारा, नंदापूर ही गावे पुनर्वसनाच्या यादीत आहेत.

प्रकल्पातून काय साध्य होणार?

सावनेर तालुक्यातील खेकरानाला जल प्रकल्पाजवळील असलेल्या कन्हान नदीवर कोच्छी प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पामुळे ३९८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याशिवाय उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागेल.

परिसरातील भूजलपातळी वाढून सिंचनातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. लगत असलेल्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यालाही याचा लाभ होईल. तसेच कोराडी विद्युत केंद्राला १४.०० दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्यात येणार आहे.

कोच्छी बॅरेज जलप्रकल्प जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे दोन वर्षात पूर्ण होणार आहेत.

-नीरज तुलसीनंदन, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे प्रकल्प,कोच्छी प्रकल्प, उपविभाग क्र .१ खापा, सावनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT