Nagpur University esakal
नागपूर

UGC News : लोकपाल नियुक्त न करणाऱ्या विद्यापीठांची यादी UGC कडून जाहीर; महाराष्ट्रातील 'या' प्रमुख विद्यापीठांचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

नागपूर आणि अमरावती विद्यापीठाने (Nagpur and Amravati University) काही महिन्यांपूर्वीच लोकपालाची नियुक्ती केली.

नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) देशभरातील सर्व विद्यापीठांना आणि उच्च शिक्षण संस्थांना लोकपाल नियुक्त करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही लोकपाल नियुक्त न करणाऱ्या विद्यापीठांची यादीच विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केली आहे. त्यात देशभरातील १०८ विद्यापीठांचा समावेश असून नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी महाविद्यालयासह एलआयटीयू आणि महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाचाही समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय तक्रारींची दखल घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी विद्यापीठात लोकपालाची नियुक्ती करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर आणि अमरावती विद्यापीठाने (Nagpur and Amravati University) काही महिन्यांपूर्वीच लोकपालाची नियुक्ती केली. मात्र, देशातील बऱ्याच विद्यापीठांनी त्याकडे कानाडोळा केल्याची बाब दिसून आली. यात महाराष्ट्रातील सात विद्यापीठांचा समावेश आहे.

त्यामध्ये नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ, एलआयटी विद्यापीठ यांचा समावेश आहे. याशिवाय पुणे येथील इंटरनॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी नाशिक, कृषी विद्यापीठ परभणी, एसएनडीटी मुंबई यांचा समावेश आहे. याशिवाय, आंध्र प्रदेशातील एन.टी.आर. विद्यापीठाचे डॉ. आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आसाममधील राजीव गांधी सहकारी व्यवस्थापन विद्यापीठ, छत्तीसगडमधील शहीद नंदकुमार पटेल विद्यापीठ, उत्तर प्रदेशमधील महाराजा सुहेल देव राज्य विद्यापीठ आदींचा समावेश आहे.

‘कर्तव्यात कसूर केल्याचा’ ठपका

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय तक्रारींची दखल घेण्यासाठी विद्यापीठात लोकपालाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, विद्यापीठांनी ती नियुक्ती न केल्याने ‘कर्तव्यात कसूर केल्याचा’ ठपका ठेवून त्यांची यादीत तयार केली असल्याचे दिसून येते. यामध्ये देशभरातील १०८ विद्यापीठांचा समावेश असून उपराजधानितील तीन विद्यापीठांचा समावेश आहे.

विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यावर ‘एलआयटी’चे स्वायत्त विद्यापीठाबाबतचे नोटीफिकेशन मे महिन्यात आले. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर कारवाई करीत, त्याची माहिती पाठविण्यात आली. मात्र, ती माहिती ई-मेल च्या माध्यमातून आजच पाठविण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारीचे निवारण झालेले आहे.

-डॉ. नीरज खटी कुलसचिव, एलआयटीयू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT