नागपूर

मंगळवारपासून दुकाने रात्री आठपर्यंत; शनिवार व रविवारसाठी हे नियम

राजेश प्रायकर

नागपूर : व्यापाऱ्यांचा संताप बघता अखेर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करीत सोमवार ते शुक्रवारपर्यंत अत्यावश्यक व अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी दिली. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आदेश सोमवारी महापालिकेत धडकताच आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशाची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, खवैय्यांना रेस्टॉरंटमध्ये केवळ चार वाजेपर्यंतच ताव मारता येईल.

मागील आठवड्यात व्यापाऱ्यांनी दोन दिवस आंदोलन केले. एवढेच नव्हे तर सोमवारी व्यापाऱ्यांनी राज्य सरकारने आदेश न काढल्यास दुकाने रात्रीपर्यंत सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. परंतु, संघर्षाचे वातावरण तयार होण्यापूर्वीच राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले. नव्या नियमावलीचे आदेश महापालिका आयुक्तांकडेही आले. त्यांनी मंगळवारपासून आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

असे आहेत नवे आदेश

  • सर्व दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत

  • शनिवारी सर्व दुकाने, मॉल्स ३ वाजेपर्यंत सुरू

  • रविवारी जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने व मॉल्स बंद

  • रेस्टॉरेंट ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू

  • जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्यूटीपार्लर्स, सलून सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी बंद

  • शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू

  • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्समधील मल्टीप्लेक्स बंद

  • रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT