unseasonal rain hit nagpur again water in house tree fall lightning  Sakal
नागपूर

Nagpur Rain Update : नागपूर जिल्ह्यात पावसाचा अवकाळी ‘वार’

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गुरुवारचा सूर्य उगवतो न उगवतो, तोच आकाशात काळेभोर ढग जमून आले. काही क्षण सर्वांनाच सायंकाळ झाल्याचा भास झाला. पाहता पाहता वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळायला सुरुवात झाली. निसर्गाचे असे अवचित रुप पाहता अनेकांच्या ह्दयात धस्स झाले.

पावसाने उच्छाद मांडल्यामुळे कुठे घराचे छप्पर उडाले, तर कुठे घरात पाणी शिरले. वीज कोसळून एक शेतकरी ठार, तर काही ठिकाणी जनावरे दगावली. अनेक वस्त्यांमध्ये मात्र पावसाळा तोंडावर असताना या निमित्ताने प्रशासनाची पोलखोल झाली.

घरात पाणी, अनेक कुटुंब आलीत रस्त्यावर

अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने चिखलमय रस्ते व रस्त्यावर पाणी साचले. आदिवासी महोत्सव आखाडा स्थळी असलेल्या वस्तीत घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे अन्नधान्य व इतर साधनसामुग्री भिजून गेल्याने परिवारांवर उपासमारीची पाळी आली.

नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात देखील नागरिकांनी टाहो फोडीत या विकासकामांकरिता ढसाळ नियोजन केल्याच्या आरोप करीत त्यांना दोषी ठरविण्यात आले. गंगाबाई नागपुरे, शालिक नागपूरे, सदाशिव मुलतेली, एकनाथ दुबे, कांता देवचंद मुळे आदींच्या घरात शिरल्याने त्यांच्याकडील साधनसामग्री व इतर साहित्य पूर्णपणे पाण्यात भिजले.

याबाबत प्रशासनाला सूचना देऊन देखील प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळावर वेळीच पोहचून मदत करु शकले नसल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात व स्थानिक आमदारांविरोधात रोष व्यक्त केला.

कोदेगाव येथे घराचा सज्जा कोसळला

कोदेगाव येथे सकाळी आलेल्या मुसळधार पावसाने जुन्या स्लॅबच्या घराचे दोन्ही सज्जे कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोदेगाव येथे गुरूवारी सकाळी मुसळधार पावसास सुरूवात झाली. अचानक कोदेगाव येथील ईश्वर चोरे यांच्या स्लॅबच्या घराचे सज्जे कोसळून रस्त्यावर पडले. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ईश्वर चोरे यांनी केली आहे.

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जाखेगाव येथील रामाजी शिवरामजी आखरे (वय ५५) यांचा आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वीज पडून शेतात जागीच मृत्यू झाला. सकाळी दहा वाजतापासून अवकाळी पावसाने सुरुवात केली. रामाजी सकाळी आपल्या शेतात गेले होते. अचानक विजाच्या कडकडासह पावसाला सुरुवात केली.

त्यावेळी रामाजी शेतातून घरी येण्यास निघाले. परंतु पांधण रस्त्यावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी ग्रामीण रुग्णालय मौदा येथे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला. सायंकाळी जाखेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे.

विकासकामे करताना भविष्यात स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली गेली नसल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे. याला जवाबदार कोण? संबंधितांवर कारवाई केल्यास पुढील कामे नियोजनबद्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

-हरीष बांगडकर, माजी ग्रां.प.सदस्य

अवकाळी पावसाच्या पाण्यात नागरिकांचे असे हाल होत असतील तर पावसाळ्यात किती हाल अपेष्टा सोसाव्या लागतील. आमदारांनी एका रात्रीत महोत्सवानिमित्त मनमर्जीने रस्ते, नाल्यांची कामे महोत्सवानिमित्त करुन घेतली. त्याचेच दुष्परिणाम आज येथील लोकांना भोगावे लागत आहेत.

-श्याम भिमटे, माजी उपसरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT