नागपूर : तीन दिवसांपासून लसीकरण बंद (Vaccination stopped for three days) असल्याने नागरिक संतप्त झाले आहे. त्यात आजही राज्य सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध (There is no stock of vaccines from the state government) न झाल्याने उद्या, चौथ्या दिवशीही महापालिकेच्या सर्वच केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे. सलग चार दिवस लसीकरण ठप्प पडल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका व शहरातील नेत्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. (Vaccination-closed-in-Nagpur-for-four-days)
२३ जूनपासून शहरात १८ वर्षांवरील तरुणाईचेही लसीकरण सुरू करण्यात आले. २३ जून ते १ जुलै या काळात २३, २४, २६ व २८ जून या केवळ चार दिवस लसीकरण झाले. २३ जूनला विक्रमी २३ हजार तर २८ जूनला विक्रमी ३० हजार नागरिकांचे लसीकरण झाले. ही आतापर्यंतची एका दिवसातील लसीकरणाची मोठी संख्या आहे. त्यानंतर २९ ते १ जुलैपर्यंत लसीकरण झालेच नाही. राज्य सरकारनेही आज लसीचा पुरवठा केला नाही. त्यामुळे शुक्रवारीही लसीकरण बंद राहणार आहे.
विक्रमी लसीकरणाचे श्रेय घेत महापौर व मनपा प्रशासनानेही आनंद व्यक्त केला. परंतु, चार दिवसांपासून लसीकरण ठप्प असल्यानंतरही महापौर दयाशंकर तिवारी व इतर पदाधिकाऱ्यांकडून नियमित लसीकरणासाठी कुठलाही प्रयत्न होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहे. अनेक नागरिकांना दुसऱ्या डोसबाबत मेसेज येत असून ते लसीकरण केंद्रांवर जात आहेत. लसीकरण बंद असल्याचे कळताच नैराश्याने परत घरी जात आहे.
तीन दिवसांपासून हा क्रम सुरू असून उद्याही कायम राहणार आहे. एकीकडे महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री सारेच लस घेण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु, लसीचा पुरवठा नियमित करण्यासाठी सरकारला जाबही विचारत नाही. त्यामुळे नागपूरकरांना आणखी किती दिवस लसीची प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
केवळ सात टक्के नागरिकांना दोन्ही डोस
आतापर्यंत शहरातील २ लाख १३ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले. शहराची लोकसंख्या ३० लाख असून त्या तुलनेत केवळ सात टक्के नागरिकांनीच आतापर्यंत दोन्ही डोस घेतल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. पहिला डोस ६ लाख ७० हजार नागरिकांना घेतला.
भाजपकडून लसीकरण सुरू
महापालिकेच्या सर्वच केंद्रावर लसीकरण बंद असताना कॉंग्रेसनगरातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मात्र भाजपकडून लसीकरण सुरू आहे. कार्यकर्त्यांसाठी लसीकरण असले तरी येथे सामान्य नागरिकांचीही गर्दी होत आहे. आज सुमारे एक हजार नागरिकांनी येथे रांग लावली होती.
शासनाकडून महानगरपालिकेला आज कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही.- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
(Vaccination-closed-in-Nagpur-for-four-days)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.