उमरेड : तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्यावतीने पिराया या गावातील पशुपालक शेतकऱ्याच्या बांधावर शेतकरी व पशुपालकांच्या मदतीने ‘कमी कालावधीत चारा उपलब्धतेचा विमा काढण्यासाठी मुरघास बनवणे’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले.
दुग्धव्यवसाय यशस्वीपणे चालविण्यासाठी मुरघास बनवण्याच्या महत्त्वाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थित सर्व शेतकरी व पशूपालकांना काही दिवसांपूर्वी पशूवैद्यकीय दवाखान्यामार्फत सुधारित वैरण बियाणे लागवडीकरिता वितरित करण्यात आले होते. पूर्ण वाढ झालेल्या वैरण, चाऱ्यापासून प्रत्यक्षात मुरघास तयार करून दाखविण्यात आले.
शासनाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या संदेशानुसार पंचसूत्री कार्यक्रमांतगर्त पाच घटकांपैकी एक वैरण विकास (फोड्डर) हे म्हत्वाचे घटक असून उच्च पोषणमूल्य असलेल्या पौष्टिक वैरणीची निर्मिती करणे, मुरघास, वैराणीच्या विटा, अशा स्वरूपाच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आदी उपक्रम या कार्यक्रमानुसार राबविण्यात आले.
जिल्हा पशू संवर्धन उपयुक्त डॉ. मंजुषा मो. पुंडलिक यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडली. शेतकऱ्यांना मुरघास तयार करण्यासाठी, तसेच लागवडीकरिता येणाऱ्या सुधारित वैरण बियाणांचे विविध जातींची माहिती दिली.
पशूपालक शेतकऱ्यांनी दवाखान्यामार्फत मिळणारे सुधारित वैरण, बियाणे व स्वखर्चाने अधिक लागणाऱ्या बियाणांची पेरणी करून, पशूवैद्यकीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मुरघास पॅकेजिंग मशीनद्वारे मुरघास तयार केले. तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय येथे उपलब्ध असलेल्या विविध सुविधांबाबतही शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी केले कौतुकउद्योजकांना (२०००-२४००मेट्रिक टन प्रतिवर्ष) मुरघास निर्मिती युनिटच्या स्थापनेसाठी योजनेचे थोडक्यात स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच योजनेमधील पात्र घटकांना एकूण खर्चाच्या ५०टक्के केंद्रीय भांडवली अनुदानासह एकूण खर्चापैकी ५०टक्के उद्योजकांना बँक खर्च किंवा स्व-खर्च करता येईल.
महत्त्वाच्या विषयावर जनजागृतीसाठी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, उमरेड टीमच्या प्रयत्नांचे गावातील व बाहेर गावातील सुद्धा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला डॉ.विनोद रा.समर्थ, पशुधन विकास अधिकारी, तेजस.ज. माकडे, रमेश गजभिये, सचिन ढोणे, सौरभ भोयर आणि इतर दुग्ध उत्पादक शेतकरी व पशूपालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.