poison sakal
नागपूर

Nagpur Crime : भेटीसाठी आलेल्या पत्नीने आरोपीला दिले विष; पतीची प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या शेख अमजद शेख शब्बीर (वय २८, रा. टेका नाका, पाचपावली) याला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालय परिसरात भेटीसाठी आलेल्या पत्नीने विष दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो बेशुद्ध होऊन तोंडातून फेस येत असल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. ही घटना दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला मेयो रुग्णालयात दाखल केले.

यशोधरानगरातील माजरी परिसरात असलेल्या फरदिन सेलिब्रेशन लॉनजवळ १७ मे रोजी यश गोणेकर (वय २१, कपिलनगर) या ओला कॅबचालकाचा खून झाला होता. याप्रकरणी आरोपी शेख अरबाज शेख इकबाल आणि असलम ऊर्फ गुड्डू मकसूद अन्सारी यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली होती.

मात्र, या प्रकरणात शेख अमजद शेख शब्बीर हा फरार होता. यशोधरानगर पोलिसांनी त्याला गुरूवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास पार्वतीनगरातून अटक केली. विशेष म्हणजे, या प्रकरणात आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.

आज शुक्रवारी शेख अमजद याची पोलिस कोठडीसाठी बंदोबस्तामध्ये प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आणण्यात आले. न्यायालय परिसरात त्याची पत्नी आयेशा आणि परिवार उपस्थित होता. शेख अमजद येताच, त्याची पत्नी आयेशा त्याला भेटण्यासाठी आली. तिने त्याच्या हातात ‘जल्लाद, जालिम जहर’ नावाची विषाची छोटी बाटली दिली.

त्यानंतर पोलिस त्याला नेत असताना अगदी दारात तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्याच्या तोंडून फेस निघत असल्याने त्याला तत्काळ यशोधरानगर पोलिसांनी मेयोत दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. विशेष म्हणजे, अचानक घडलेल्या प्रकाराने त्याच्यासोबत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसोबतच न्यायालयाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनाही धक्का बसला.

गुढ कायम

शेख अमजद शेख शब्बीर हा कुख्यात गुंड असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत. त्याने आपल्या साथीदारासह जुन्या भांडणातून यश गोणेकर या कॅबचालकाचा खून केला. एक महिन्यापासून तो फरार होता. गुरुवारी रात्री त्याला अटक करीत सकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करीत त्याच्या पोलिस कोठडीसाठी न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर पत्नी त्याला भेटली आणि तिने विष दिले. मात्र, अचानक पत्नीने त्याला विष का दिले ? हा प्रश्‍न अनुत्तरित असून पोलिस याचा तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT