Voting Sakal
नागपूर

नागपूर : ३८ नगर पंचायत व दोन जि. प.साठी कडाक्याच्या थंडीत मतदान

विदर्भातील (Vidarbh) विविध जिल्ह्यांतील ३८ नगर पंचायत आणि भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील दोन जिल्हा परिषदेतच्या निवडणुकांसाठी मंगळवारी उत्साहात मतदान झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भातील (Vidarbh) विविध जिल्ह्यांतील ३८ नगर पंचायत आणि भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील दोन जिल्हा परिषदेतच्या निवडणुकांसाठी (Nagar Parishad Election) मंगळवारी उत्साहात मतदान (Voting) झाले. याशिवाय ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठीही यावेळी मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी कडाक्याच्या थंडीतही मतदारांमध्ये मतदानासाठी प्रचंड उत्साह दिसून आला.

अमरावती - जिल्ह्यातील भातकुली व तिवसा नगरपंचायतच्या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. १९ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. भातकुली येथे १६ प्रभागातील निवडणुकीसाठी एकूण ६० उमेदवार, तर तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत. आज नागरिकांची मते मतपेटीत बंद झालीत.

यवतमाळ - जिल्ह्यातील बाभूळगाव, राळेगाव, कळंब, महागाव, मारेगाव व झरी जामणी या सहा नगरपंचायतींची सार्वत्रिक तर ढाणकी नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सरासरी ७५ टक्के मतदान झाले. ४२३ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’बंद झाले आहे. सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक तर ढाणकी नगरपंचायतीच्या दोन अशा रिक्त ८६ जागांसाठी तब्बल ४३५ उमेदवार रिंगणात आहे.

वाशीम - मानोरा नगर पंचायतच्या २६ जागांसाठी आज मतदान पार पडले. यामधे ५९ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. ओबीसी आरक्षणावरून ११८ ग्रामपंचायतमधील १८९ जागांसाठी जिल्ह्यात मतदान पार पडले. मानोरानगर पंचायतसाठी सरासरी ७० टक्के मतदान झाले.

वर्धा - जिल्ह्यातील समुद्रपूर, कारंजा, आष्टी आणि सेलू नगर पंचायतीकरिता मतदान शांततेत पार पडले. यात ५४ जागांसाठी सरासरी ७६ टक्के मतदान झाले. रिंगणात असलेल्या २२३ आमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठल्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले.

भंडारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आज सायंकापर्यंत शांततेत मतदान झाले. शेवटपर्यंत ६८ टक्के मतदान झाले असून, साकोली व लाखांदूर तालुक्यांत अधिक प्रमाणात मतदान झाले आहे. तसेच तीन नगरपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात मंगळवारी जिल्हा परिषदेचे ३९ गट आणि पंचायत समितीचे ४९ गणांसाठी १३२२ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यात एकूण ६६२ उमेदवार रिंगणात होते.

गोंदिया - जिल्हा परिषदेच्या ४३ गट व पंचायत समितीच्या ८६ जागांकरिता मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीत उभ्या असलेल्या एकूण ६३१ उमेदवारांचे भाग्य मतदारांनी मतदान यंत्रांमध्ये बंद केले. दरम्यान, मुरकुडोह-३ येथील मतदान केंद्र १७ ते १८ किलोमीटर अंतरावरील धनेगाव येथे हलविण्यात आल्याने नाराज मुरकुडोह व दंडारी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

गडचिरोली-: जिल्ह्यातील ९ नगरपंचायत व ४६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान मंगळवारी घेण्यात आले. पारा सात अंशांवर व कडाक्याची थंडी असतानाही मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदान ७५. ४१ टक्के झाले, तर ४६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी ७३.७२ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elcid Investments Share Price: जुलै महिन्यात ३ रुपयांना असलेल्या शेअरची किंमत २ लाख ३६ हजार; MRF चं रेकॉर्ड मोडलं

Sports Bulletin 29th October : न्यूझीलंडविरूद्धच्या वन-डे मालिकेत भारतीय महिला संघाची बाजी ते स्मृती माधनाचे विक्रमी शतक

INDW vs NZW: Smriti Mandhana चे विक्रमी शतक अन् भारताने सामन्यासह जिंकली मालिका

Rahul Gandhi: ''अदानींच्या एकाधिकारशाहीला सरकारचे संरक्षण'', राहुल गांधींचा गंभीर आरोप

Government Jobs: पेपरफुटीच्या कायद्यामुळे महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांवरचं विघ्न टळलं, एक लाख उमेदवारांची निर्विघ्न भरती

SCROLL FOR NEXT